नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

आई, बहीण, मुलगी, पत्नी ह्या सगळ्या जवाबदऱ्या सहज पार पाडून आपले देशप्रेम आणि राष्ट्रीयकर्तव्य लीलया पार पडणाऱ्या अनेक वीरांगना भारतमातेच्या उदरी जन्माला आल्या. त्या नुसतीच मैदानावरची लढाई नाही लढल्या तर त्यांनी कठोर लढा दिला समाजरचनेला, शत्रूला, जो त्यांच्या आणि त्यांच्या राष्ट्र प्रेमाच्या आड येईल त्या सगळ्यांना आणि आपलं स्त्रीपण झुगारून नव्हे तर ते सुंदर रित्या स्वीकारून, सांभाळून मानाने जगल्या आणि तश्याच विरगतीला प्राप्त झाल्या. अश्या वीरांगना आज इतिहासाच्या पानात कुठेतरी लपल्या, लोपल्या त्यांना ही माझी शाब्दिक मानवंदना.


मातंगिनी हाजरा

गांधी बुढी असं प्रेमाने हाक मारली जाणारी स्त्री कशी असेल ह्याचा शोध घायचा ठरवला आणि मातंगिनी हाजरा पांढरी खादीची साडी नेसणारी एक वृद्ध महिला इतिहासाच्या पानात लपलेली आढळली.

ही क्रांतिकारी इतकी इतिहासात गहाळ झाली की तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल फार कुठे वाचनातच नाही आलं. मग ह्या मातंगिनी चा शोध सुरू झाला. १८६९ साली होगला गावात मातंगिनी चा जन्म एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरात अठराविश्व दारिद्र्य नांदत असतांना तिथे सरस्वतीचा वास कसा होणार? मातंगिनी ला शिक्षण मिळालेच नाही. नशिबात लक्ष्मी परत एकदा आडवी आली, हुंडा देण्याची परिस्थिती नव्हतीच मग काय वयाच्या १२ व्या वर्षी ६० वर्षीय त्रीलोचन हाजरा ची पत्नी झाली. केवळ सहा वर्षाचे संसार सुख आणि मातंगिनीला वैधव्य आलं.

मातंगिनी आपल्या व्यवहाराने सगळ्या गावाची आई झाली. १९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली.

मिठाचा सत्याग्रह : १९३० साली त्यांना सशक्त कारावास झाला. शिक्षा भोगून बाहेर आली पण तिने कर निर्मूलनासाठी परत एकदा निषेध केला आणि परत एकदा कारावास नशिबी आला ह्यावेळी ६ महिन्यांसाठी बहारामपूर येथे. ६ महिन्यानंतर बाहेर आल्यावर ती काँग्रेस कार्यकर्त्या बनली आणि गांधीजींच्या प्रभावामुळे खादी सूत कातायला आणि विणायला शिकली.

आता भारत छोडो आंदोलन सगळीकडे जोर पकडत होते. त्या अंतर्गत सरकारी कचेऱ्यांवर आपला झेंडा फडकवणे असा कार्यक्रम भारतभर सुरू होता. ७२ वर्षीय मातंगिनी ६००० कार्यकर्त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत तामलूक पोलीस ठाण्याकडे पुढे गेली. पोलिसांनी आंदोलनकरींवर गोळ्या झाडायला सुरवात केली, पहिली गोळी मातंगिनी च्या दंडावर लागली, तरीही पुढे होत तिने पोलिसांना आव्हान केले की तुम्ही निशस्त्र लोकांवर गोळ्या झाडू नका. तरीही गोळीबार सुरू राहिला. मातंगिनी ला ३ गोळ्या लागल्या, ती चालतांना ‘वंदे मातरम’ असं मोठ्याने घोषणा देत होती, आपल्या सहकाऱ्यांना साथ देत होती. हातात तिरंगा घेऊन पुढे चालत असलेली मातंगिनी कोसळली आणि विरगतीला प्राप्त झाली.

कुठलंही शिक्षण नसतांना केवळ आपल्या मनाच्या निर्धारावर देशासाठी वयाच्या ७२ व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीरांगनेला माझे शतशः नमन.

— सोनाली तेलंग.

संदर्भ: विकिपीडिया, अमारदेश ऑनलाइन.कॉम, Amritmahotsav.nic.in

०४/०६/२०२२.

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

1 Comment on भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

  1. सोनाली ताई नमस्कार मी रवींद्र वाळिंबे आपल्या देशात स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यात किती महिला कार्यरत होत्या हे वाचून खूप आनंद झाला.आपले दुर्दैव की या वीरमाता बद्दल आपल्याला शिकवले जात नाही. आपण यामध्ये पुढाकार घेऊन कष्टपूर्वक प्रयत्न करून या भारतीय वीरांगनाचे लिखाण केले व वाचकासमोर आणले त्या बद्दल आपले खूप खूप आभार. या गोष्टींचे संशोधन करणे, माहिती मिळवणे किती कष्टदायक यांची मला पूर्ण कल्पना आहे.सर्व वीरांगनाची माहिती उपलब्ध केल्या बद्दल पुन्हा आपले आभार.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..