नवीन लेखन...

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते…नड येते

….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो…

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो…. …

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो… अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो…

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं… आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं नेमकं कोण आपल्या कामात पडत हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं…

आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही…मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो…

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते…!!!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही… पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं… आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं…!!!

असो… आपणा सर्वांच्या आयुष्यात कमीत कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो…!!!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच…

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच…

तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः “कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता…

मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही…

ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते…

चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच…

संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका…

स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा बस…!!!

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..