बाळाचं नाव निवडतांना.

नामकरण संस्काराला ज्योतिषशास्त्राचा आधार घेण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून सर्वच धर्मात आणि देशात अजूनही रूढ आहे. नाव ठेवतंाना आपल्याला माहित असलेल्या म्हणजेच ओळखीच्या गुरूजींचा आपण सल्ला घेतो त्यांच्याकडून बाळाची जन्मपत्तिका तयार करून घेतो आणि राशिनुसार आलेल्या आद्याक्षरावरून बाळाचे नाव निवडतो. अशातने निवडलेले नाव बाळाला लाभदायक ठरून

त्याची भरभराट होआील ह्यावर विश्वासही ठेवतो. विश्वासावरच आपण आपले आचरण करीत असतो आणि त्यामुळे आपल्याला समाधान मिळते.परंतू विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास अनेक शंका अुद्भवतात आणि त्यांची समाधानकारक अुत्तरे मिळत नाहीत. उदा. हिंदू कालगणनेप्रमाणे निरयन पद्धतीत चंद्राच्या भ्रमणावरून राशी ठरविल्या जातात आणि त्यानुसार जन्मकुंडल्या तयार केल्या जातात तर पाश्चिमात्य देशात सायन पद्धतीप्रमाणे सूर्य भ्रमणावरून कुंडली बनविली जाते आणि त्यानुसार नामकरण केले जाते. दोन्ही पद्धतीत त्याच बारा राशी आहेत. परंतू या दोन कालगणनानुसार वेगवेगळ्या राशी येतात. त्या त्या पध्दतीत त्या त्या राशीचे भविष्य पहावे असे म्हणतात परंतू ते भविष्य वेगवेगळे असते असा अनेक वेळा अनुभव येतो.विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास नाव अुच्चारताना किंवा वाचताना निर्माण होणार्‍या ध्वनीलहरी आणि मेंदूतील लहरी यांनाच महत्त्व आहे. बाकीच्या बाबी अंधश्रद्धा ह्या सदरातच मोडतात असे समजावे. नावांच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा आहेत. काही बालके जगत नाहीत त्यामुळे नंतर झालेल्या बालकांना अुकीरडा, कचरा, दगडू, दगडी, धोंडू, धोंडी अशी विचित्र नावे ठेवण्याची अेकेकाळी पद्धत होती पण आता ती सुशिक्षित समाजात तरी राहिली नाही.थोडक्यात म्हणजे जन्मकुंडली ही बाळाच्या जन्मवेळी असलेली आकाशातील ग्रहगोलांची सापेक्ष स्थिती ठरावि

पध्दतीने दाखविण्याची अेक रीत आहे. बाळाच्या जन्मवेळी असलेला तो ग्रहगोलांचा नकाशाच आहे. अेखाद्या सुतिकागृहात अर्ध्यातासाच्या कालावधीत पाच बालकांचा जन्म झाला तर त्या पाचही बाळांची जन्मपत्तिका अगदी अेकसारखी असेल पण त्यांचे जीवन मात्र अगदी भिन्न असू शकते. ही वस्तूस्थिती फार पूर्वीपासूनच

सर्व ज्योतिषी मंडळी जाणून होती आणि यासाठी योग्य ते स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. पूर्वजन्मीची बरी-वाआीट कर्मे आणि त्यांचे भोग ह्या संकल्पनेने ते स्पष्टीकरण देता आले. आता आपल्याला माहित झाले आहे की त्या बालकांचे ग्रहगोलीय नकाशे सारखेच असले तरी त्यांचे जनुकीय नकाशे भिन्न असल्यामुळे त्यानुसार त्यांचे जीवनही भिन्न पकारे व्यतीत होआील.जपजाप्य आणि त्याचे व्यक्तींवर होणारे परीणाम कोणत्या आधारावर अवलंबून आहेत हा ज्याचा त्याचा विश्वास आहे. जपजाप्य करतांना किंवा ध्यानधारणा करतांना होणार्‍या मनाच्या अेकाग्रतेचा लाभ होतो की निर्माण होणार्‍या ध्वनी लहरींच्या कंपन अुर्जेमुळे फायदा होतो हे कळणे कठीण आहे. मनातल्या मनात जप केल्यास मेंदूत चालणार्‍या विचारांमुळेही वीजचुंबकीय लहरी निर्माण होतात त्यामुळे अच्छित परीणाम साधता येतो का? सजीवांचा मेंदू नेहमीच कार्यरत असतो. विशेषत: जेव्हा तो विचार करीत असतो तेव्हा तर वीजचुंबकीय लहरी निर्माण होतात आणि अुर्जा अुत्सर्जित होते हे निश्चित कारण या तत्वाच्या आधारावरच मेंदूचा Electro Encephelo Graph (EEG) काढतात आणि ते अनुभवाने पूर्णतया स्वीकारलेले विज्ञानीय सत्य आहे.व्यक्तीच्या अपरोक्ष तिचे नाव मनातल्या मनात किंवा मोठ्या आवाजात अुच्चारल्यास मेंदूत निर्माण होणार्‍या वीजचुंबकीय लहरी किंवा वातावरणात निर्माण होणार्‍या नादलहरी त्या व्यक्तीपर्यंत पोचत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीच्या नावातील स्पंदने त्या व्यक्तीपर्यं
त पोचतच नाहीत तर त्या व्यक्तीवर त्यांचा परीणाम तो कसा होणार? पण ती व्यक्ती हजर असतांना तिचे नाव अुच्चारल्यास किंवा वाचल्यास आवाजाच्या लहरी किंवा नाव वाचणार्‍याच्या मेंदूत निर्माण होणार्‍या लहरी यांचा त्या व्यक्तीवर परीणाम होणे शक्य आहे. परंतू ह्या दृष्टीकोनातून अुपलब्ध होणारी आकडेवारी नाही किंवा विज्ञानावर आधारित प्रत्यक्ष प्रयोगही केले नसावेत.निसर्गाने आपणास पाच ज्ञानेंद्रिये दिली आहेत. त्यांच्या सहाय्याने सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान होते. धोक्याची जाणीव होअून स्वत:चा बचाव करता येतो. प्रतिकार आणि आक्रमण करता येते. अन्न आणि आहार मिळविता येतो. सुख अुपभोगता येते आणि अतर सजीवांशी संफ साधता येतो. सादप्रतिसाद देता येतो. स्पर्श दृष्टी ध्वनी वास आणि चव ह्याद्वारे कार्यक्षमतेने संदेश मिळविण्यासाठी काही मर्यादा असतात त्या मर्यादेतच संवेदना ग्रहण करणे शक्य होते अतकेच नव्हे तर ते सुखावह देखील होते.त्वचेद्वारे आपण संवेदना ग्रहण करू शकतो. कुणी गाल कुरवाळला तर गोड वाटते पण त्याच गालावर थप्पड मारली तर शारीरिक आणि मानसिक वेदना होतात. गुदगुल्या केल्या किंवा स्त्रीपुरुषांनी अेकमेकास स्पर्श केला की सुखावह वाटते परंतू जोरात चिमटा काढला तर वेदना होतात. कारण त्वचेची सुखावह मर्यादा ओलांडली जाते. त्वचेला झालेल्या वेदना धोक्याची सूचना देतात. अंधुक पकाशात डोळ्यांना नीट दिसत नाही आणि धोका होण्याचा संभव असतो तर तीव्र पकाशात डोळे दिपून दिसेनासे होते. हलके रंग सुखावह वाटतात तर भडक रंगांमुळे त्रास होतो. भिंतींना लावावयाचे रंग विकणार्‍या रंगवाल्याच्या दुकानात चौकशी करावी. ज्या रंगांचे डबे सर्वाधिक विकले जातात ते रंग समाजात प्रामुख्याने स्वीकारले जातात असा निष्कर्ष निघतो. काही ठराविक वास गोड वाटतात पण घाण वास नकोसा होतो कारण काही सुवास
सुखाची भावना निर्माण करू शकतात. घाण वास धोक्याची सुचना देतात. अन्नात मीठ कमी असेल तर पदार्थ अळणी लागतात. मिठाचे प्रमाण हळुहळू वाढवीत गेल्यास अन्नास चव येअू लागते. मिठाच्या विशिष्ट प्रमाणात तर पदार्थ फारच चवदार लागतात. पुढे खारटपणा नकोसा होअू लागतो आणि त्याच्याही पुढे मळमळ होअून अुलटी देखील होते.अगदी हळू आवाज असेल तर अैकूही येणार नाही आणि फार मोठ्या आवाजामुळे डोकेदुखी होते आणि बहिरेपण देखील येअू शकते. स्वर आणि मृदू व्यंजने यांची कंपने कानाला गोड वाटतात. संगीतातील काही राग बहुसंख्य जनतेला

फार आवडतात. त्यामुळे प्रेमभावना निर्माण होअू शकतात. शास्त्रीय संगीतामुळे वनस्पतींची जलद वाढ

होते आणि गायीम्हशी जास्त दूध देतात असे प्रयोगांती आढळले आहे. श्रीकृष्णाने पावा वाजविला म्हणजे गायी जास्त दूध देत असत असा समज आहे त्यामागे हेच अनुभवसिध्द विज्ञान असावे का?नावांच्या बाबतीतही ठराविक कंपन संख्या जास्त स्वीकार्य असू शकते. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनांनी सुरूवात होणारी किंवा त्यांचे अधिक्य असणारी नावे संख्येने अधिक आहेत अधिक स्वीकार्य आहेत. अुदा. हरिणाक्ष किंवा मृगाक्ष हे मुलाचे आणि हरिणाक्षी आणि मृगाक्षी ही मुलींची नावे चंागली वाटतात. हरणाच्या डोळयासारखे सुंदर टपोरे डोळे असणारी व्यक्ती असा ह्या नावांचा अर्थ आहे. अुलट मीनाक्ष किंवा मीनाक्षी ह्या नावांचा अर्थ म्हणजे मासोळीच्या डोळयासारखे गोल गरगरीत डोळे असणारी व्यक्ती असा नसून मासोळीच्याच आकाराचे सुंदर लंाबट डोळे असणारी व्यक्ती असा आहे. पहिल्या दोन नावांत ह र ण क श आणि म र ग क श अशी व्यंजने आहेत तर तिसर्‍या नावात म न क श ही व्यंजने आहेत. ती अधिक मृदू असल्यामुळे मीनाक्ष किंवा मीनाक्षी ही नावे अधिक गोड वाटतात. मासोळीसाठी संस्कृतात मीन हा शब्द रूढ करतांना नादमाधुर्याचा व
चार केला असावा.रंगपेटीतील निळा रंग आणि पिवळा रंग अेकमेकात मिसळले की हिरवा रंग तयार होतो हे आपणा सर्वांना चांगलेच माहित आहे. मिश्रित रंगात निळ्या आणि पिवळ्या रंगांच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही. निळ्या आणि पिवळ्या रंगांचे प्रमाण बदलवून हिरव्या रंगाच्या अनेक छटा निर्माण करता येतात.प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्या नादाची किंवा आवाजाची ठराविक कंपनसंख्या असते. त्यांनी तयार झालेला शब्द जेव्हा आपण अुच्चारतो तेव्हा या कंपनांमुळे निर्माण झालेल्या मिश्रित कंपनसंख्येचा नाद किंवा आवाज आपल्या कानांना जाणवतो. स्वर आणि मृदू व्यंजनांनी निर्माण झालेली मिश्र कंपने कानांना गोड वाटतात तर कठोर व्यंजनांची कंपने फारशी आवडत नाहीत. काही मृदू व्यंजनात थोडी कठोर व्यंजने मिसळली तरीही नादमाधुर्य साधता येते. जसे खारट आणि तिखट चव आपणास आवडत नाही पण खाद्य पदार्थात तिखटमीठ योग्य प्रमाणात घातल्यास खाद्यपदार्थास खूपच चांगली चव येते. ‘मीनाक्षी’ तला क्ष हा असाच गोडवा निर्माण करतो. संगीतात सा रे ग म प ध नी या सप्तसुरांचे योग्य मिश्रण करून अनेक कर्णमधूर राग निर्माण झाले आहेत. शब्द आणि नावांच्या बाबतीतही हाच पकार घडलेला आहे.बाळासाठी योग्य नाव निवडतांना या सर्व बाबींचा अवश्य विचार करावा. वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येआील की बाळासाठी नावे निवडतंाना नाद नावातील सुटसुटीतपणा आणि प्रचलित संकेत यानुसारच नावाची निवड केली जावी आणि अंधश्रद्धा बाजूल्या ठेवल्या जाव्यात. अशारितीने निवडलेले नाव बाळ मोठे झाल्यावर त्यालाही आवडेल अशी खात्री आहे.

तुमचं नाव तुम्हाला आवडतं का? तुम्ही तुमच्या आआीवडिलांना विचारा की तुमचं नाव कुणाच्या आवडीनं ठेवलं गेलं. आणखी

अेक प्रश्न. तुमचं नाव तुम्हाला बदलावसं वाटतं का?गजानन वामनाचार्य सोनमोहर 180/4931, पंतनगर घाटकोपर(पूर्व) मुंबई 400 075.फोन : 022-501 2897, 9819341841.

— गजानन वामनाचार्यगजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 72 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी एकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक आहेत. ६०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…