नवीन लेखन...
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

भल्लातक/बिब्बा

माझ्या माहिती प्रमाणे बिब्याचा वापर पूर्वी परिट कपड्यांवर खुणा करून ठेवायला करत असत.तर असा हा बिब्बा औषधांमध्ये काळजीपूर्वक वापरल्यास अमृता समान काम करतो. ह्याचा ७-१२ मीटर उंच वृक्ष असतो.काण्डत्वचा काळपट राखाडी असते व तोंडल्यावर त्यातून दाह जनक रस निघतो.पाने ३०-७५ सेंमी लांब असून १२-३० सेंटीमीटर रूंद असतात.हि अभिलट्वाकार असून शाखेच्या अग्रभागी उगवते.फुल एकलिंगी असून हिरवट पिवळे […]

जपा/जास्वंद

लाल जास्वंद हि आपल्या लाडक्या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे.प्रत्येकाच्या अंगणात हि हमखास आढळते.आजकाल ह्याचे कलम करून अनेक रंगांची,अनेक जातींची जास्वंद आपल्याला पहायला मिळते.पण जी गावठी जास्वंद लाल किंवा पांढऱ्या रंगाची असते तिच औषधी असते.त्यामुळे औषधी उपयोगीकरिता तिच वापरली जाते. जास्वंदीचा अनेक शाखा प्रशाखायुक्त गुल्म असतो.ह्याची पाने लट्वाकार,स्निग्ध,चमकदार,लांब टोकाची,खाली अखंड व वर दन्तुर कडा असलेली असते.फुले […]

निंब

कडूनिंबाचा उपयोग आपण बऱ्याच प्रसंगी करतो.आपले हिंदू नव वर्ष अर्थात गुढी पाडवा ह्या दिवसाची सुरूवात नाही का आपण कडूनिंबाचा रस पिऊन करत.आपल्या शास्त्रात किती महत्त्व आहे पाहीलेत ना कडूनिंबाला. ह्याचे १४-१६ मीटर उंच वृक्ष असतो.खोड टणक,सरळ वाढणारे असते पाने विषमपक्ष असून २०-३५ सेंमू लांब असतात पत्रकाच्या कडा दंतूर असतात.फुले मंजीरी स्वरूपात असतात पांढरी.फळ लांबट गोल १.२५-२ […]

कुमारी/कोरफड

हिचा वापर आपण घरगुती उपचारांमध्ये सर्रास करत असतो.तशी हि आपल्या सर्वांचीच अगदी जीवाभावाची सखी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण प्रत्येकाच्या घरात अंगणात हिचे एखादे तरी रोप आढळतेच. हिचे क्षुप ०.३३-०.६५ मीटर उंच असते.पाने ३०-४० सेंमी लांब व ७-१० सेंमी रूंद असतात.हि टोकाकडे निमुळती होत जातात.पाने मांसल असतात त्यांच्या कडा काटेरी असतात व पृष्ठ भागावर पांढरे ठिपके […]

निर्गुण्डी

हि उग्र वासाची गुल्म वनस्पती आहे.हिचे २-४ सेंमी उंचीचे क्षुप असते.ह्याच्या पानांच्या कडा दंतुर अथवा अखंड असतात.पाने मागच्या बाजुस पांढरी लव युक्त असतात व गुळगुळीत असतात.साधारेण पणे एका वृन्तावर ५-१५ सेंमी लांबीच ३-५ पत्रके असतात.फुले लहान व गुच्छ युक्त पांढरी किंवा निळी असतात.फळ गोल व पिकल्यावर काळे दिसते. ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बिया,पंचांग,मुळ. आता आपण ह्याचे गुणधर्म […]

एरंड

बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात. ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात […]

हंसराज/हंसपदी

हि वनस्पती पाणथळ प्रदेशात व डोंगराळ भागात उगवणारी आहे.हि ०.५-१.५ सेंमी उंचीचे क्षुप असते.पाने गुळगुळीत,तांबूस काळी व पर्णदंडावर उगवतात.हि १-३ सेंमी लांब असून ह्याच्या मागील भागावर काळ्या रंगाचे बीजाणू असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे पंचांग.ह्याची चव तुरट असून ती थंड गुणाची व जड असते.हि कफ पित्तनाशक आहे. आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू: १)जळजळ व जखम ह्यात […]

पुनर्नवा

पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी […]

किराततिक्त/काडेचिराईत

आपण लहान असताना आपली आई किंवा आज्जी दर रविवारी आपल्याला सकाळी उठवून जे बाळकडू पाजत ते हेच किराईते.कृमींपासून संरक्षण व पोटला बरे म्हणून आज हि बऱ्याच घरांमधून सर्वांनाच हा कडू काढा रविवारी पाजण्याची प्रथा आहे. ह्याचे ०.५-१.५ मीटर उंचीचे वर्षायू क्षुप असते.काण्ड खाली गोल व वर चतुष्कोणी असते.पाने अभिमुख ५-७ सेंमी लांब व १-२ सेंमी रूंद […]

अगस्त्य/हादगा

।। सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामि।। अगस्त्याचे ७-१० सेंमी उंचीचे अल्पायूषि व लवकर वाढणारा वृक्ष असतो.काण्ड सरळ व विरळ फांद्याचे असते.पाने १५-३० सेंमी लांब असतात व त्यास ४१-६१ पत्रके असतात.फुल पांढरे,नौकाकार,मंजिरी स्वरूपात असते.फळ ३० सेंमी लांब वाकडे असते व त्यात १५-२०बिया असलेली शेंग असते. ह्याचे उपयुक्त अंग पंचांग असून हा चवीला कडू,व थंड गुणाचा असतो व गुणाने […]

1 3 4 5 6 7 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..