नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस

४५.सकाळी ऊठून दंड जोर बैठका मारून, मुद्गल फिरून, दंडाच्या बेटकुळ्या हलवून दाखवणारी आमची पिढी आणि पोटावर सिक्स पॅक दाखवणारी आजची पिढी. केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक […]

आजचा आरोग्य विचार – भाग चौवीस

३३. एका जागी बसून दात घासण्याची परंपरा विसरून फिरत फिरत दात घासायला लागलो. ३४.अंथरुणात, गादीवर, बेडवर बसून, काही खायचे नसते, ही भारतीय परंपरा विसरलो. ३५. आंघोळ झाल्याशिवाय खायचे सोडाच, स्वयंपाकघरात जायचे सुद्धा नाही, ही आदर्श पद्धत विसरत चाललो. ३६. दात तोंड स्वच्छ केल्यावर चेहरा पुसण्यासाठी आपला स्वतंत्र नॅपकीन न घेता, बेसिनवरचा सार्वजनिक टाॅवेल वापरू लागलो. त्यामुळेच […]

आजचा आरोग्य विचार – भाग तेवीस

३१ धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत. हे धुमपान प्रदूषण वाढवण्यासाठी नसून रोग कमी करण्यासाठी होते. […]

आजचा आरोग्य विचार – भाग बावीस

२९. कर्णपूरण. म्हणजे कानात तेल घालणे. फक्त आणि फक्त भारतातच सांगितला जाणारा हा चिकित्सा स्वरूप आणि प्रिव्हेंटीव प्रकारचा एक उपचार. अन्य पॅथीमधे असे कर्णपूरण इन्फेक्शनच्या नावाखाली निषिध्द मानले आहे. त्याचे ‘रिट्रो इन्स्पेक्शन’ करण्याची तसदी पण कुणी घेत नाहीत. आमच्या पॅथीमधे नाही म्हणजे नाहीच, असा जो एककल्ली सूर काहीवेळा ऐकायला मिळतो, त्यांच्या कानानाकात तेल घालूनच ते लहानाचे […]

आजचा आरोग्य विचार – भाग एकवीस

२६. कवल. म्हणजे गाल फुगवून तोंडात पाण्याची चुळ धरून ठेवणे. वेगवेगळ्या औषधी काढ्यांची, तेलाचे कवल अवस्थेनुसार प्रकृतीनुसार गुण दाखवतात, याविषयी लेखन झाले आहे. हा अस्सल भारतीय दैनंदिन उपचार होता. हा उपचार आता केवळ ‘चुळ भरणे’ एवढ्या स्तरावर आला आहे. २७. गंडूष. हा पण भारतीय विचार. गुळण्या करण्याने अनेक मुख रोग कमी होतात. या विषयी सुद्धा पूर्वी […]

आजचा आरोग्य विचार – भाग वीस

२२. तिकडे जाऊन आल्यावर हात धुवावेत. हात पाण्याने धुवावेत, पण माती किंवा रखा सुद्धा वापरावी. असेही सांगितलेले आहे. आज साबण वापरला जातो, चेहेऱ्याचा साबण वेगळा, घामाच्या दुर्गंधीचा वेगळा, (एवढं करून घामाची दुर्गंधी येतेच ती झाकली जावी म्हणून वर डिओडोरंट आहेतच ! ) केसांचा वेगळा, पुरुषांचा वेगळा, स्त्रियांचा वेगळा, लिक्वीड सोप वेगळा, वडी वेगळी, दाढीचा वेगळा, फोमदाढीचा […]

आजचा आरोग्य विचार – भाग एकोणीस

१९ दोन नंबरला कुठे जावे ? पूर्वी घरात जेवण करावे आणि मलविसर्जनाला घराबाहेर जावे अशी पद्धत होती. आता काळ बदलला. आता घराबाहेर खायचे आणि घरात येऊन मलविसर्जन करायचे ??? करणार तरी काय म्हणा शहरीकरण ही गरज झाल्याने त्याला आता पर्यायच नाही. असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे झाले. पण जंतुसंसर्गाचा मोठा सोर्स आपण घरातच आणून ठेवल्यावर काय […]

आजचा आरोग्य विचार – भाग अठरा

भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत. पण पाश्चात्य पद्धतीच्या कमोडमधे मात्र अशी उताराची व्यवस्था नसते. […]

आजचा आरोग्य विचार – भाग सतरा

१७. उघड्यावर शौच करू नये. हे भारतीय संस्कृती सांगतेय. केवळ शौचच नाही तर स्नान सुद्धा उघड्यावर करू नये, असं आपल्या संस्कृतीमधे सांगितलेलं आहे. जिथे जिथे जंतुसंसर्ग होऊ शकतो अशा ठिकाणी कमीत कमी वेळ असावं, ही दृष्टी यामागे दिसते. सांगितलेलं आहे एक आणि व्यवहारात केलं जातं दुसरंच हा दोष संस्कृतीचा होत नाही. मल विसर्जन उघड्यावर करणे म्हणजे […]

आजचा आरोग्य विचार – भाग सोळा

१६. मौनात अर्थ सारे ! भारतीय पद्धतीच्या मलविसर्जनामधे एक प्रमुख भाग येतो, तो म्हणजे मौन. मलविसर्जन करताना मौन पाळावे. अजिबात बोलू नये. अगदी स्वतःशी सुद्धा ! संध्या, जप, भोजन, दंतधावन, पितृकार्य, देवकार्य, मलमूत्र विसर्जन, गुरुंच्या सान्निध्यात असताना, दान आणि योग करीत असताना मौन पाळावे, असे शास्त्र वचन आहे. मग करायचे काय ? तर सतत वर्तमानात रहायचे. […]

1 2 3 4 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..