नवीन लेखन...

आजी

विसरले जाणे येणे विसरले गणगोता माझिया सोनुल्याची फक्त आजी आहे आता ।। माझिया….. दिन उगवतो माझा त्याच्याच आवाजाने दिन मावळे रात्रीला त्याची अंगाई गाता गाता ।। माझिया….. आठ वाजले का बाई झाली दूधाची गं वेळ जीव होई कासावीस वेळेवरी आटोपता ।। माझिया….. दहा वाजले जाहली आंघोळीची त्याची वेळ आता वाजणार भोंगा जरा साबण लावता ।। माझिया….. […]

जगावेगळे नाते

(अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी प्रथा. आता सासूने आपल्या सुनेला वाण देऊन तिच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर) अधिकाचे फळ अधिकच लाभते अशा कथा ऐकते तीसतीन ह्या वर्ष दिनाला अभिनंदन करते । पोटी न आलीस तुझ्या आईने भरली माझी ओटी देवाजीने तुला नर्मिले केवळ आमच्यासाठी । घरात आलीस घरची झालीस दूधात साखर पडली दुध कोठले […]

आमचा कट्टा

अस्सा आमचा कट्टा बाई, अस्सा आमचा कट्टा मिळून सार्‍याजणी करतो, गप्पा थट्टा ।। अस्सा आमचा कट्टा कोण म्हणतो ग्रूप करावा, फक्त तरुणांनी आम्ही देखील करू शकतो, आमचि मनमानी भेदभाव नाही येते, छोटा आणि मोठा, अस्सा आमचा कट्टा रोजचा नाष्टा वेगळा, अन् रोजचा बेत वेगळा पावभाजी शेव चिवडा, शिरा चकली वडा लोणची, संत्री केळ्यांचाही, होता चट्टामट्टा अस्सा […]

लोकल

(चाल : झुक झुक झुक रेल गाडी) आली नशिबी रेलगाडी रेल कसली जेल गाडी – झुक झुक … दादर हारबर सी.टी. लोकल हिशेब येथे असतो पळपळ कुणी गुदमरे कुणी लटकते कुणी मारते उडी । – झुक झुक … कमला, विमला, अमला आली कुणी नवोढा कुणी अवघडली वृद्ध कोणी, षोडश वर्षा कुणी चंचल गुड्डी । – झुक […]

मुलीचा पाळणा (गौरी)

तीन तपे गेली गौरी घरी नव्हती आली चिमुकल्या पावलांनी दारी प्रकटली गौरी आली गौरी कसे करू मी स्वागत हृदयाच्या पाळण्यात झेलते अलगद ।। गौरी आली गौरी आनंदले घरदार आगमने तिच्या परिपूर्ण हा संसार ।। गौरी आली गौरी सानथोर पुलकित कुठे ठेवू कुठे नको झाले कवतिक ।। गौरी आली गौरी झूला फुलांनी सजवा सोनुल्या ह्या अपर्णेला पाळणी […]

मुलाचा पाळणा

माझा गं बाळ राजा, पाळणी खेळतसे पैंजण वाजतसे, त्याच्या पायात छमछमा । माझा गं बाळ राजा, घरात रांगतसे मनगटी रूततसे, त्याच्या हाताला सांभाळा । माझा गं बाळ राजा, पाऊल टाकतसे सोनसरी चमकतसे, त्याच्या गळ्यात चमचमा । माझा गं बाळ राजा, दुडूदुडू धावतसे साखळी रूळतसे, त्याच्या कमरेत रुणझुणा । माझा गं बाळ राजा, भुकेचा हळूवार भरवते खीर, […]

डोहाळे जेवण

ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी मिरवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।। सुगंधित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची, डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।। कौसल्येचा राम, देवकीचा […]

मंगळागौरीची आरती

(चाल : आरती साईबाबा) जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता, महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण, धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय…… सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा, झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय…… नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान, […]

झिम्मा

पिझ्झा बेकतो, वास सुटतो मुंबईचा राजा डिस्को खेळतो रोल रोल रोल रॉक अॅण्ड रोल जाझच्या तालावर सांभाळा तोल सर सर गोविंदा येतो मजवरी चिखल फेकीतो या या होंडावरती या आमचा नखरा पहा पहा सलवार कमीज बॉयकट वेण्यांची नको कटकट आमच्या वेण्या कोठल्या फॅशनसाठी छाटल्या गौरी बसली नाह्याला हॅलो शांपू लावियला शांपू झाला फेसच फेस गौरीचे झाले […]

सासू सून संवाद (३)

सासू : अगं अगं सूनबाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ? सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला. सासू : अगं अगं सून बाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ? सून : चुन्याची डबी रोज जातं मागं. सासू : अगं अगं […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..