नवीन लेखन...
Avatar
About सुरेश कुलकर्णी
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

समस्या! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १०

मित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो. […]

तुमसे अच्छा कौन है? – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ९

देव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात. […]

गुरु! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ८

ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो, आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु! आतून आपण कोठे ना कोठे ‘दिव्यांग’ असतो, कमजोर असतो. त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा ‘गुरु’ हवा आहे, किमान मला तरी.

आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी? […]

मदत! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ७

परमेश्वर या ना त्या रूपाने मदतीला धावून येतच असतो. पण खरे सांगू तो, आपल्यातल्याच कोणाला तर त्या क्षणापुरता आपले ‘देवत्व’ देत असतो. त्या क्षणी ती व्यक्ती ईश्वराची भूमिका जगते. समोरच्या माणसाची मदत करते. तुमच्याही जीवनात असे क्षण आले असतील, आणि येतीलही. आपणच, बरेचदा ‘मीच का करू?’ म्हणून ती भूमिका टाळून देतो. अशी ‘मदत श्रुंखला’ पैश्याने भरपाई करून, किंवा फक्त ‘धन्यवाद’ म्हणून, खंडित करून टाकतो. […]

आईची ‘भेट’! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ६

कधी कश्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल माहित नसते. तशी फारसी श्रीमंती नव्हती. पण खाऊन पिऊन तिचे कुटुंब सुखी होते. प्रेमळ नवरा, गोंडस मुलगा, समाधान घरात नांदत होत. आणि तो ‘काळा दिवस’ उगवला. क्षुल्लक आजाराचे कारण होऊन नवरा तिला आणि मुलाला अनाथ करून गेला. आभाळ कोसळ तिच्या डोक्यावर. […]

पुरून उरिन! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ५

खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर—! […]

ऍबॉर्शन! ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ४

डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते. […]

बाहुली! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – ३

ते एक खेळण्याचे दुकान होते. काचेच्या शोकेस मध्ये खेळणी मांडून ठेवली होती. त्यात सुंदर बाहुल्या, लाकडी रंगीत घोडे, उंट, खेळातली भांडी अजून काहि काही गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. येणारी लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पहाण्यात रंगून जात.दुपारची वेळ होती. दुकानात गिऱ्हाईक नव्हते. मालकाने नौकरास जेवण करून घेण्यास सांगितले. त्याचे जेवण झाल्यावर, मालक जेवायला निघून गेला. […]

शिक्षा! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – २

मुळात, कोणताच माणूस ‘गुन्हेगार’ म्हणून जन्मत नाही. परस्थिती त्याला घडवत असते, असं म्हणतात. खूप पूर्वी ‘जेल रहित राज्य!’ हि कल्पना माझ्या वाचनात आली होती. कदाचित त्याची मूळ या कथेत असावीत. […]

1 2 3 4 5 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..