Avatar
About श्वेता संकपाळ
Ms. Shweta Kashinathi Sankpal. Born at Satara Dist. in 16 Dec, 1994. Spend all childhood & education in Thane. My hobbies to make poems ,to give speech, to handle new subject, to do debate & anchoring etc. I did Msc in organic chemistry.
Contact: Facebook

क्षण !

क्षण क्षणाने रंगुन गेला,🎨 क्षण क्षणात भंगुन गेला,🎯 क्षण क्षणांत रोम दाटले,💞 क्षण क्षणांचे मोती झाले !💎 क्षण क्षणांचे गुलाम झाले,👁️ क्षण क्षणांत गुंतुन गेले,💞 क्षण क्षणात चिंब न्हाले,💦 क्षण क्षणांत क्षणिक झाले !💫 क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨ क्षण क्षणांस ओझे वाटले,🗯️ क्षण क्षणात स्मृती भासले,💬 क्षण क्षणात वाहत गेले !🏞️ क्षणात हसले , क्षणात रडले,🤡 […]

कळलेच नाही !

एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न […]

जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव, नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव… गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून, की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन? तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू? सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ? मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास […]

वेड !

सोबत तु असताना, तुझ्यात अथांग रमावं वाटतं…! हात हातात गुंतवूनी, बाहुत निजावं वाटतं…! नजरेस नजर मिळवताच , ओल्या पापण्यांत भिजावं वाटतं…! अबोल प्रीत खुलताना, घट्ट मिठीत शिरावं वाटतं…! बेधुंद बेभान होवूनी , कुशीत तुझ्या विरावं वाटतं…! वेड लावले तुझे मला तू, वेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं …! — श्र्वेता संकपाळ (०६-०३-२०१९)

डोळ्यांआड

सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप, माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !! हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो, माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!! सांगते जरा ऐका, नका……!! तुझं तू माझं मी, असं फक्तं मुखाने बोलतो, डोळ्यांआड दुसऱ्या ताटात जिभाळ गाळीत डोकावतो!!२!! सांगते जरा ऐका, नका……!! परके आले पुढ्यात, तत्त्व प्रदर्शन […]

आकांत

विखुरल्या त्या वाटा साऱ्या, भावनेचाही झाला अंत, अंधत्व आले, दिशा हरवल्या, ना उरली हृदयास मनाची खंत !! दुःखाने पायघड्या अंथरल्या , अश्रूंनी खारे गालिचे पांघरले , किर्र किर्र त्या काजव्यांसारखे, अंधाऱ्या रात्रीत तांडव माजले !! विटले धागे सुखी नात्याचे, आकांत करुनी निष्ठुरले मन, भासत होते मृगजळ ते सुखाचे , उरले हाती सुतकी जीवन !! — श्र्वेता […]

स्त्री

लाजेची मशाल नयनी, नाकात नाजूक नथनी, लाल ओठ गुलाबी छान, स्त्री तू सौंदर्यांची खाण… झुपकेदार शेपूट कुंतलेचं, मुक्त कमरेवरी रुळलेलं, शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची, गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं… उडे ऐटीत डौल पदराचा, कुंपण घाली मंद वारा, झाकाळलेल्या या रुपासमोरी, फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा… कामिनी गं तु योवणाची, वसुंधरेची अभिमानास्पद मान, अंकुश घाली स्त्रिशक्तिवर, हे शृंगारिक देह वरदान… […]

तो

सहवास होता तुझा, सदोदित साथ देणारा…! संयम होता तुझा, माझे बोल झेलनारा…! जिद्द होती तुझी, नितांत प्रेम करण्याची…! तुझ माझ नातं कस्तुरीचं, एक थेंब सागरात मिसळलेलं….! एक थेंब सागरात मिसळलेलं….! – श्र्वेता संकपाळ

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं, अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं, थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं, तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं, प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं, कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! – श्वेता‌ संकपाळ

यशोगाथा

Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात, रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!! तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त, जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!! संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी, कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!! अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले, आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी […]

1 2 3