नवीन लेखन...

पावसाने हलकं झालेलं आभाळ

पावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्‍यासंग हुदडलं — शरद शहारे

चहुकडे अंधार पडलेले

चहुकडे अंधार पडलेले दुरवर नजर जात नाही आकाशी चंद्राला चांदण्या काही केल्या सोडत नाही — शरद अर्जुन शहारे

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

डॉ. विशाखा घालते – प्राचीन वास्तू संवर्धनाचा जागर

आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत. […]

रंग बदलणारं झाड – करू

रंग बदलण्याची गोष्ट  निघाली  तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते  मात्र  नागपूर जिल्ह्यातील  वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते. […]

मुक्त कविता

सुर्यास्त जवळ आला पायाखाली रेगाळणारी सावली पाठमोरी झाली पाखरांचा गलका परता परता घरट्यात असा सुचक संदेश देऊ लागला.. शिवारात एकच गडबड पश्चिमेला सुर्य झाला डोगंराआड. पाय गुमाण घराच्या ओलीन अंधार चिरत चुल पेटवली होती तिनं पातेल्यात शिजत होते चार दाने खदखदत आयुष्याचे…. खाऊणघ्या…पिऊन गटा गट पाणी…मोजा चांदणे… काळोखात लुकलुकणारे स्वप्न! आणि झाला उल्कापात बघून सुधा मागणे […]

दिस कलतीला आल्यावर

दिस कलतीला आल्यावर ओढ लागते घराची माय बाप पोरं ढोर आसेसुन असतात कवाची येणार बा, येणार मा तोंडात साय दुधाची उरफाट जग हाय उलघाल उराची थांब जरासा पुरा कर झाली का येल केकावतो लमंढीचा म्हणतो फुकाचा तेल — शरद शहारे, वेलतूर

सुर्य किरणें रानभर

सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली  वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे  

उगवलेला दिवस

उगवलेला दिवस सावलीसह सरकतो जगंलात गेली गुरढोर रस्ता घराचा धुंडतो ओढ लागुन पिल्याची चिमणी ही परतते काटा रूतयो पायी तरी अलगद असा काढते गाय हंबरते मनात दुधाचा ओवा पान्हावते थांब रे बाला थोडं लवकरच मी पोहोचते पावले झपाझप पडती घराच्या लागल्या ओढीन दिस गेला दुराव्याचा हाक दिली लेकरानं — शरद शहारे

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..