नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावे

आज ९ नोव्हेंबर.. आज अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेचा वाढदिवस. सुबोध भावे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला. मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने सशक्त भूमिका साकारल्या. ‘अवंतिका’,‘वादळवाट’ आणि सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत्या. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे. ‘बालगंधर्व’ […]

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मा.पु.लं. चे काही किस्से

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ‘ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा […]

अंतु बर्वा

कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. “अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी ‘? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो […]

पु. ल. देशपांडे

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले अशा पु. ल. देशपांडे यांची जयंती. पु. ल. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘पु लं’चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज येथून कॉलेज पूर्ण केले. भास्कर संगितालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. पु ल,नी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या […]

हे सुरांनो, चंद्र व्हा….

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं  ‘ययाती देवयानी’ या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद.. हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते […]

प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

आज ७ नोव्हेंबर… प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांची पुण्यतिथी. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण […]

मराठी लेखक आणि पटकथालेखक य.गो. जोशी

आज ७ नोव्हेंबर.. मराठीतील लेखक आणि पटकथालेखक  यशवंत गो. जोशी यांची पुण्यतिथी त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०१ रोजी झाला आणि प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास […]

नवरात्र

आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असते. आश्वििनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या […]

सुनीता देशपांडे

आज ७ नोव्हेंबर..आज मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या *सुनीता देशपांडे यांची पुण्यतिथी* जन्म :- ३ जुलै १९२५ पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. मा.पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही […]

1 408 409 410 411 412 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..