नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आर्मी डे

भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते. भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे. भारतीय लष्कराची […]

ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर

कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’मुळे […]

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित उल्हास कशाळकर

पंडित उल्हास कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला.कशाळकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या त्याच्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्याक भीमपलास, यमन, शुद्ध […]

माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी हा सूर्याचा उत्सव

सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, […]

बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ – साधना

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी ‘फॅशन आयकॉन’ म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. साधना यांचे नाव घेतले तरी कित्येकांच्या नजरेसमोर ‘मेरे मेहबूब’ चित्रपटातील नायक राजेंद्रकुमारकडे बुरख्याआडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात. या चित्रपटात पहिल्यांदाच नायक राजेंद्रकुमार यांची नायिकेशी गाठ पडते तेव्हा साधना यांचे बोलके डोळे त्यांचा आणि […]

दैनिक लोकसत्ता

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्र समूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार […]

मार्लेश्वरची यात्रा

सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, […]

संतूर या तंतुवाद्याची ओळख

शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर […]

मधुमेह टाळता येतो

आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न […]

घसा खवखवणे आणि दुखणे

घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात. त्यामुळे घशाच्या आजारात अनेकदा कानही दुखवतो आहे, अशी रुग्णाला भावना येते. जिवाणू अगर विषाणूजन्य दाह, इजा होणे, […]

1 380 381 382 383 384 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..