नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सुप्रसिद्ध संतूर वादक पंडित उल्हास बापट

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा, पं के जी गिंडे आणि पं वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: […]

मराठी संगीतकार दशरथ पुजारी

बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम […]

आपल्या अभिनय आणि नृत्याने पन्नास-साठचे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर

जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक कलाकार म्हणून जयश्री गडकर यांनी सुरवात केली. १९५५ साली रशियन नेते कुश्चेव्ह आणि बुल्गानिन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यातील पुणे […]

ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख

मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर

लीना चंदावरकर यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी धारवाड येथे झाला. सुरुवातीला जाहिरातीत काम केल्यावर मा. सुनील दत्त यांनी लीना चंदावरकर यांना पहिला ब्रेक दिला. तो चित्रपट होता मन की मित, १९६९ ते १९७९ या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे केली. पण मेहबुब की मेहंदी या चित्रपटाने त्यांना नाव कमावून दिले. सिद्धार्थ […]

क्रीडा दिन

आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर […]

मराठी लेखक आणि चित्रकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू. त्यांचा जन्म ६ जुलै १९२७ रोजी झाला. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी ‘माणदेशी माणसे’ (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे […]

संगीतकार राम कदम

मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच […]

ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ

विलायत खाँ यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे […]

मराठी चित्रपटांतील अभिनेत्री मनोरमा वागळे

मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि […]

1 264 265 266 267 268 384
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..