नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मार्लेश्वर यात्रा

दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. आज रात्री मार्लेश्वरची पालखी, आलेल्या दिंड्या यजमान आणि मानकऱ्यांसह शिखराकडे प्रयाण करतील. १४ जानेवारीला पहाटे साखरपा येथील गिरीजादेवीच्या पालखीचे मानकऱ्यांसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, पसंती, मागणी टाकणे, मानपान असे विधी संपन्न झाल्यावर १४ जानेवारीला(संक्रातीच्या दिवशी) दुपारी १२ नंतर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा मंगलाष्टकांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. […]

सिद्धहस्त लेखक श्रीकृष्ण जनार्दन जोशी उर्फ श्रीजं

‘श्रीजं’चे लेखन अत्यंत ताजं आणि टवटवीत असे. ‘पुण्यात दुमजली बस येते’, ‘हुजूरपागेच्या मुली’, ‘ओंकारेश्वर ओंकारेश्वरी गेले’,’ पीएमटी एक संकीर्तन’, ‘सदाशिव पेठ साहित्यपेठ’ अशांसारखी त्यांच्या लेखांची शीर्षकंही पुणेकरांना जवळची असत. […]

प्रसिद्ध तबलावादक अहमदजान तिरखवाँ खान

१९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात. […]

संगीत शारदा नाटकाचा पहिला प्रयोग

या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या विवाहाच्या किमान वयाचा कायदा करावा लागला. तो आजतागायत लागू आहे. […]

वेदाभ्यासक मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते. […]

मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशन संस्थेचे प्रमुख सुनील मेहता

जन्म.२९ ऑक्टोबर १९६६ साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापन केली. १९७६ साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रे १९८६ साली सुनील मेहता यांच्याकडे आली. पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी […]

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे

सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. […]

रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती

अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते. […]

राष्ट्रीय युवा दिवस

युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. […]

ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे

मामा पेंडसे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला. मामा पेंडसे हे गाजलेले नट होते. ‘पंडितराज जगन्नाथ’,‘वहिनी’,‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मामा पेंडसे यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. मामांचा दुधाचा व्यवसाय होता. केवळ नाटकातून […]

1 2 3 4 319
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..