About समीर गायकवाड
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

अंघोळाख्यान

अंघोळ नसेल तर जीवन परिपूर्ण होत नाही. व्यासांच्या महाभारतात नसलेली, पण लोकवाङ्मयातून झिरपलेली एक विलक्षण कथा म्हणजे ‘जांभूळ आख्यान’ अनेकांना ज्ञात असेल पण हे ‘अंघोळाख्यान’ प्रत्येकाचे स्वरचित असते आणि त्याची मजा काही औरच असते.. […]

लॉरेन्स ओलिव्हीयेचे सिनेमॅजिक

किशोरवयात इंग्रजी सिनेमे पाहण्याचे वेड कसे लागले हे नेमके सांगता येत नाही.हे चित्रपट पाहून आलं की काही दिवस डोकं त्यातच गुंतून पडलेलं असे. ४५ पैसे किंवा ८५ पैशाचे मॉर्निंग शोचे तिकीट काढले तरी काम भागत असे. माझी सिनेमांची आवड समृद्ध करण्यात इंग्रजी सिनेमांनी मोलाचा हातभार लावला. एमजीएमचा आयाळवाला सिंह पडद्यावर येऊन डरकाळी फोडायचा तेंव्हा अगदी भारी […]

रीमा लागू – पैलू पडायचे राहून गेलेला हिरा

रीमा लागू, भक्ती बर्वे आणि लालन सारंग या तिघीजणी सारख्या देहबोलीच्या आणि चेहरेपट्टीत काहीसे साम्य असणारया गुणी अभिनेत्री होत. भक्तीचं अकाली जाणं जसं हुरहूर लावून गेलं तसं आताचं रीमाचं अकस्मात जाणं चुटपूट लावून गेलं. या दोघींच्या तुलनेने लालन सारंग वयाने मोठ्या आणि कलेचा जास्त अवकाश लाभलेल्या. रीमाने साकारलेल्या चित्रपटातील भूमिकाइतक्याच तिच्या नाट्यभूमिका उत्कृष्ट होत्या. किंबहुना पडद्यापेक्षा […]

‘बाहुबली’च्या यशाचा नेमका मतितार्थ

‘बाहुबली’च्या यशाचा नेमका मतितार्थ शोधताना १९७५च्या ‘जय संतोषी मां’ पर्यंत गेले की त्यातला नेमका मतितार्थ लक्षात येतो. त्याचाच हा रंजक आलेख… १० जुलै २०१५ ला ‘बाहुबली द बिगिनिंग’ रिलीज झाला आणि देशभरातील १२५ कोटी जनतेसह तमाम मिडियाकर्मींचे कान टवकारले गेले. बाहुबलीने भारतीय जनतेला चर्चेला एक नवा विषय दिला आणि चित्रपटविषयक तमाम परिमाणे मोडीत काढली. याधीही अनेक चित्रपटांनी तुफान गल्ला गोळा केला […]

नग्नतेच्या दृष्टी

ऑनलाईन असताना कितीही बिनचूक सेटींग केलेलं असलं तरी एखादं ‘तसलं’ छायाचित्र वा व्हिडीओ हळूच आपल्या स्क्रीनवर झळकून डोळे मिचकावून निघून जातो, आपल्या स्क्रीनवर ‘हे’ आलंय वा येऊन गेलंय हे कुणी पाहिलं नाही याची खातरजमा होताच आपण सुस्कारा टाकतो…पण वस्तुस्थिती काय असते ? एखादं नग्नचित्र दिसणं म्हणजे काय किंवा त्याकडे पाहणे म्हणजे काय याचे उत्तर एका पुस्तकातून […]

बॉलीवूडचे मरणोपरांत भोग

विनोदखन्नाच्या मृत्यूनंतर ऋषीकपूरने बॉलीवूडवर त्रागा व्यक्त केलाय. त्याने असे का केले याच्या उत्तरासाठी थोडं मागे जावे लागेल. […]

एक रात्र ‘नाईट शो’ची ……

आपल्या चौकटीबाहेर एक जग असेही आहे की जिथे कधी काय घडेल याचा नेम नाही… साठ सत्तर एकर शेताच्या मधोमध असणारे ते पाच एकराचे माळरान असावे. बहुधा असे कार्यक्रम तिथे नित्याचे असावेत. त्या पाच एकराच्या तुकड्याला चारी बाजूनी पलानी होत्या. पलानीच्या कडेने निलगिरीची उंच गेलेली दाट झाडी आणि खाली जमीनीलगत चौहूबाजूनी दाट बदामाची झाडं. या ठिय्यापर्यंत पोहोचायला […]

प्रिय विनोद

प्रिय विनोद, सोशल मीडियात आणि वृत्तवाहिन्यांवर आत्ता दु:खद बातमी पाहीली… बॉलीवूडी चित्रपटात तू एकमेव तगडा अभिनेता असावास जो मिशीतदेखील हँडसम वाटायचा आणि सफाचट ओठांच्या लुक्समध्येही देखणा दिसायचास. तुला तुझी दणकट आणि पिळदार शरीरयष्टी दाखवण्यासाठी कधी शर्ट काढून उघडबंब वावर करावा लागला नाही की कधी आवळ शर्ट घालून त्याच्या बाह्या मुडपून वरती घ्याव्या लागल्या नाहीत. तुझा मर्दानी […]

सिंहासन

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा ,किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मेटकुळे करून बसलेला आहे, काही वेळापूर्वी त्याला सीएमचा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्या फोनच्याच विचारात आहे. इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट […]

‘डिस्को व्हॅम्प’

खणखणते ड्रमबीटस, कोंगोच्या रिदमिक बॅशवर चकाकणारे रंगी बेरंगी लाईट्स. गुबगुबीत उशीतल्या कापसासारखी स्मोक मशीनमधून अखंड वाहणारी धूम्रवलये, लेसरच्या लाल हिरव्या निळ्या लाईटस. वेड्या वाकड्या वाढवलेल्या झिपऱ्याच्या अवतारात, कधीकधी तोंडं रंगवून, काही बाही चित्रविचित्र तंग कपडे घालून नाचणाऱ्या ललना आणि अंगाला झटके देत नाचणारी पोरे पोरी, जोडीला झिंग आणणारं संगीत अन अंग थिरकवायला लावणारी लय यांचं अजिबोगरीब […]

1 2 3 16