नवीन लेखन...
प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]

प्रामाणिकपणा

लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली  जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या  कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते? […]

हरवले माझ्या कोकणातले काही तरी

काही गोष्टी काळाच्या ओघात दिसेनाशा होणार असतात हे आपण जाणून असतो पण काही करू शकत नाही. पण त्या गोष्टी दृष्टीआड झाल्या की हुरहूर लागून राहाते. मी गावाकडे कोकणात बऱ्याच वेळा जात असतो. जेव्हा जातो तेव्हा काही जुन्या गोष्टींची आठवण होते आणि मनात त्या काळाची आणि आजची  तुलना सुरु होते. मग काय हरवले ह्याची एक यादीच मनात घेर धरू लागते. […]

यंत्रसंपदा आणि आरोग्य

यंत्रयुग, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्यांनी आपली जीवनपद्धती पार बदलून टाकली आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे ह्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी – त्यासाठीच हा लेख-प्रपंच. यंत्रसंपदा पण वापरायची आणि आरोग्य पण राखायचे ह्याचा मंत्र समजून घ्यायला हवा. आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे. […]

सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला. […]

आठवणीतले गिरणगाव

लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही. […]

एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे. […]

‘लाय लाय लाय लाय लायेकरणी’ कोळीगीताच्या निमित्ताने

“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील  आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील. […]

कोकणात विमान भरारी

कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. […]

खराब रस्ते

आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत? खराब होणारे […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..