नवीन लेखन...

संवाद.. की द्विवाद..?

तर आजचा आपला विषय आहे, ‘मुलांचं एकमेकांसोबत खेळणं’. मुलांचं मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते. […]

आजारपण.. नको रे देवा !

काही जुने किस्से सांगणार होते; पण फ्रेश स्टॉकसुद्धा तयार झालाय! …म्हणजे काय.. तर कोरोनातून अगदीच उठतोय आम्ही..! हा आजारपणाचा अनुभव माझ्या मुलींसाठी खास् होता. गेली दोन वर्षे घरात सुरक्षित राहून साधा सर्दी खोकला सुद्धा मुळी नव्हता, आणि आता झालं ते एकदम सगळंच! शिशुवर्गांत जायला लागल्यापासून अगदी नेमाने २-३ महिन्यांतून एकदा दोघी किंवा दोघींपैकी एक, कसलंसं इन्फेक्शन घेऊन यायची, आणि मग सगळं घर झोपायचं..! …सांगते! 🙂 […]

काही चांगल्या सवयी

दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते. […]

संयमाची परीक्षा

दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना! […]

आमची पहिली स्पर्धा

गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची, दोघींची ती पहिलीच वेळ होती! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता. […]

दे आर सेम सेम बट डिफ्रंट

आपल्या दोन्ही मुलांना जोडीने सगळं करताना बघण्यात अमाप गोडी आहेच. पण ह्यांना दोन वैयक्तिक व्यक्तिमत्त्व म्हणून वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी, आपल्याही बुद्धी-शक्तीचा कस लागतो. दुर्मिळ आव्हान वाटतं मला तर हे! आपल्या ओटीत आलीयेत, तर जमेल तेवढ्या संयमाने त्यांची जोपासना करायची, हे माझं व्रत. […]

जुळ्यांचं रूटीन आणि आपला पेशन्स

सगळ्यांनाच माहितीये, घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो. एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं. त्यामुळे त्यावेळच्या रुटीनमध्ये उसंत नावाच्या गोष्टीला मोठी सुट्टी देण्यावाचून पर्याय नसतो. […]

नवी सुरुवात (जुळ्यांना वाढवताना)

साडे सात वर्षांपूर्वी, Gyanac ने जेंव्हा जुळी असल्याचं confirm केलं, तेंव्हा खरं तर काही मिनिटांसाठी आम्ही दोघेही निःशब्द झालो होतो. तसं पाहाता साहजिकच आहे; तरीही एका मुलासाठीच कशीबशी मानसिक तयारी केलेले आम्ही, जुळ्यांसाठी सर्वार्थाने तयार होतो का, हा एक मोठा प्रश्न होता. […]

अय्या! तुम्हाला जुळ्या आहेत?

ही जुळी मुलं एकाचवेळी दुपटीने सगळं देतात… मग तो आनंद असो, प्रेम असो, त्यांचं आजारपण, दुखणं, खर्च असो, त्यांची भांडणं, हट्ट, दंगा, अपघात, जिव्हाळा, आणि (मोठेपणी पालकांपासून) एकदम दुरावणं..! हे सगळं दुपटीने पालकांना अटॅक करतं! यातल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या दोघांना एकाच वेळेला होत असतात, तर काही एकमेकांमुळे. […]

‘जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..