नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

शब्दांविना संवादू

शब्दांविना संवादू, असंभव”” तो वाटतो, किमया त्यांची न्यारी”, अर्थ मर्म दाखवतो, शब्दांवाचून किती भाषा, मानव नेमका वापरतो, परंतु त्यांच्यासम हा , म्हणत म्हणत कसा, वर्चस्व त्यांचे मानतो,– स्पर्श बोले कधीकधी, मात्र शब्दांसारखा, तान्हुल्यांची खास सोय, जाणे बाळ ममता, माय–!!! , हाच स्पर्श जादू करे, प्रेमभावना व्यक्त करे,–!! आबालवृद्धां आधार वाटे , इतुका बोलका अगदी भासे,– खाणा-खुणा […]

जखमी होऊन पिल्लू पडले

जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले, आईस बोलावे सारखे, पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी, कळेना तिला काय जाहले, कसे पडले ते खाली ,–? करूण साद ती ऐकून कोणी, धावत आला दयावंत, अती गरीब असूनही, पक्षिणीस भासे देवदूत, हळुवार हाते पिल्लाला, जवळ घेऊन कुरवाळी, साशंक मनाने पक्षीण मात्र, सारखी हिंडे भोवताली, […]

तू असा…. तू तसा…

तू असा, तू तसा,तू कायसा, कायसा, अनंत रुपे भगवंता, घेतोस कशी रात्रंदिवसा,–!!! कधी वाऱ्याचा स्त्रोत तू, कधी, खळखळणारे पाणी, कधी खोल खोल दरी तू, कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!! शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी, झऱ्याजवळ का धबधब्यात, सोनेरी उन्हात राहशी, का डोंगरातील कपारीत,–!!! बाळाच्या हास्यात दडशी, का अंधारल्या गुहेत, प्राण्यांच्या दिमाखी बघावे, का पक्ष्यांतील सौंदर्यात,–!! जगातील आश्चर्यात पहावे, की, […]

राधे, केवढा केशसंभार

राधे, केवढा केशसंभार, जीव गुंतला त्यात फार, का असे ते मोकळे सोडशी, केसांची जादू मिरवशी, –!!! रक्षक की मी या विश्वाचा, दुसरा तिसरा नच” कोणता, असे असूनही बघ किती,— केशकलापां पडलो फशीं,–!!! केस तुझे मानेवरून रुळती, बटां -बटां वाऱ्यावर खेळती, बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, ‌ अडके त्यात जीव, हीच भीती–!!! सुंदर काळेभोर कुंतल, खूप त्यात खोल […]

किती गुरु जीवनात, महत्त्व त्यांचे जाणावे,

किती गुरु जीवनात,महत्त्व त्यांचे जाणावे, सामोरी गुरु कित्येक त्यांचे मोल ओळखावे,–!!! आई-बाप श्रेष्ठ गुरु असती, निसर्ग त्याखालोखाल, मित्र आणि अनुभव सांगती, चरित्र आणि वाटचाल,–!!! कोण कसा आहे कळते, पाहून संगत त्याची, मित्रांचे स्थान अढळ, तेच मानसिकता घडवती,–!!! आई-बाप जन्मदाते, सुखदुःखातील मोठे वाटेकरी, नतमस्तकआपण रहावे, जगताना परोपरी,–!!! निसर्ग शिकवतो मूकपणे, ते आपण समजून घ्यावे, लहान पान सांगते, […]

त्या झऱ्यापाशी

त्या झऱ्यापाशी, एकच झाड उभे होते, निश्चल, निर्धास्त, अढळ, वाऱ्यावर झुलत होते , वर्षे गेली दिन गेले, रात्री आणि दिवस सरले, अनेक बाके प्रसंग आले, आले गेले नि परतले, झाड मात्र तसेच राहिले, झऱ्याकाठी लोक येती, पाण्याने ताजेतवाने होती, अनेक म्हातारे कोतारे , डोळ्यातून पाणी काढती, त्यांच्या असती किती, तारुण्यातील गोड स्मृती, तिथेच येती तरुण-तरुणी, हातात […]

आज मन आनंदले

आज मन आनंदले, सुखाच्याही पा–र गेले, भंवसागरी तरणे खासे, आता सोपे वाटले,–!!! दुनियादारी निभावणे, असते किती कठीण, तरीही तावून-सुलाखणे, सहजी कसे जमले,–!!! मनमोर थुई थुई नाचे, पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,–! खंबीर,धीरगंभीर राहणे, तटस्थभूमिका निभावावी, येऊ देत वारे–वादळे, मात्र एक झुंज द्यावी,–! तुझ्यापेक्षा मी सरस, म्हणत त्यांन भिडावे, संकटांचे सतत घोर, […]

किती चाले गडबड ही

किती चाले गडबड ही,कोण वरे कोणाला, वारा वाहे दाही दिशा, आभाळ पाहे धरणीला,–!!! झुळुक झुरे वाऱ्यासाठी, वारा वरतो हवेला, थंडी तडफडे उन्हाकरता , उन मात्र सावलीसाठी,–!!! रोप तरसते मातीला, माती जीवनासाठी तरसे , जीवन तडफडे ढगांसाठी, ढग आकर्षित विजेने,–!!! वीज आभाळा शोधे, आभाळ डोळे क्षितिजा लावे, क्षितिज उत्कंठित पहाटेसाठी, पहाट तळमळे सूर्यामात्रे,–!!! सूर्य पाहे वाकून वाट, […]

कुठे नाही स्वरूप देवा

कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा, काळीज नमते तुज पाहता, चराचरातील या घटका, — निसर्ग मज वाटतो, तुझेच रुप देवा, तिथेच आम्ही तुला मानतो, स्वरूप कोणते का असे बा, ना तू कुठल्या देवळा, ना कुठल्या मंदिरी, प्रत्येकाच्या हृदयी बसशी,असशी तू हरी,—- प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, कुठे तू नसशी फक्त सांग मज गा ,—!!!! माणुसकी […]

घनदाट त्या वृक्षाखाली

घनदाट त्या वृक्षाखाली,पांथस्थ विश्राम करे, दमुनी भागुनी थकुनी, आपले ठेवे ओझे खाली,–!!! माथ्यावर उन्हे तळपती, सावलीत आश्रय घेत असे, थंडगार पाणी पिऊनी, तहान तो भागवत असे,–!!! वाटसरू तो गरीब बिचारा, त्याच्या भुकेलाही धोंडे, पाणीच भूक भागवे, सोडवीत पोटाचे कोडे,–!!! गाठोडे आपले घेऊन डोई, पांथस्थ हात-पाय पसरे, डोळे मिटुनी जमिनीवरी, शांत निवांत होऊन पहुडे,–!!! निद्रादेवी रुंजी घाली, […]

1 19 20 21 22 23 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..