Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

आमची राजहंसी जोडी

आमची *राजहंसी जोडी, फिरते मस्त या तलावी, डौलदार माझा राजा, लोक आम्हा पाहत राहती,–!! सौंदर्य आमुचे राजसबाळे, मुखडे तर किती देखणे, आम्हा पाहण्या होड चाले, नेहमीच या तलावाकाठी,–!!! डुबुक डुबुक पाण्यामध्ये, आम्ही विहरतो शानदार, रंग शुभ्र लोभसवाणे आकर्षित लोक इथे फार,–!!! पर’ फैलावीत, सूर मारत, सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी, कुणी प्रवासी थक्क होतो,–!!! लाटांच्या […]

बीजाचे समर्पण पहावे

बीजाचे समर्पण पहावे, स्वतःला देऊन टाकते, एक तरु जन्माला यावे, म्हणूनच स्वतःला गाडते,—!! पुन्हा मातीत रूजून, एकदम कात टाकते, अंकुराचा स्वरूपाने , मातीच्या कुशीत येते,–!!! काळी आई कुरवाळते , सर्व संगोपन करते, बघता बघता नजरेत भरते, अंकुराचे फोफावणे, –!!! अंकुराचा त्याग करून, बीज वाढीस लागते, रोपट्याच्या स्वरूपात, सानुले झाड उगवते ,–!!! रोपट्याला फुटती पाने, त्यांचेही वर […]

वाऱ्यावरती हलती तरुलता

वाऱ्यावरती हलती तरुलता,पाने,फळे त्यातून बहरती, निसर्गाची किमया सारी, मानवा तू शिकणार कधी,-!!! सारी संपत्ती निसर्गाची, तुझा देह ही केवळ माती, का एवढी अहंता बाळगी, मातीमोल सारे,मिळता गती,-!! मी, माझे, माझे करत राहशी, वृत्ती का नसावी समाधानी,–? धरातली नच तुझे काही, — तुज याची जाणीव नाही,–!!! त्याग शिकवतो निसर्ग केवळ, दातृत्व त्याचे मोठे किती, कळले ज्याला तो […]

भाषा जिला गौरवते

भाषा जिला गौरवते, त्या मातीचेच गान , मातेहूनही ती मोठी, भाषा देत असे अधिक वेलांटी,–! ती आहे सृजनांत , सर्वांची काळी आई, तिच्या कुशीतून जन्म घेतो, आपण सारे, पक्षी, प्राणी, –! ती करते जसे संगोपन, जिवांचे नित्य जतन, म्हणूनच तिला रोज करावा, नेमाने आपण प्रणाम,—! काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व, जीवनातील संजीवनी, तिच्याविना सृष्टी […]

आनंदाने नाचत गात

आनंदाने नाचत गात, घेत हृदयाचे ठाव , चाललो मी पुढे पुढे , झरा माझे नाव,–!!! कपारीत डोंगराच्या, जन्म होई माझा, झुळझुळ वाहत जाता, होत असे मी मोठा,–!! शांत निर्मळ पाणी, हळूहळू पुढे जातसे , पारदर्शक थेंब लोलक, नजरेत ना भरती कसे,–!! असे धवल थेंब धावती, त्यांची बनते सुरेख नक्षी, ती बघण्यास उत्सुक हा, सारखे येती माझ्यापाशी,–!! […]

रोपाचे बनता झाड

रोपाचे बनता झाड, फांदी अन् फांदी डंवरे, सडा पडे खाली फुलांचा, जणू गालिचाच पसरे, फांद्या फुटण्याआधी कसे, धुमारे तिथे फुटती, बघतां बघतां आकार वाढून, तिज फांदी म्हणती, किती बहर येई फुलांचा, ती भरे *नखशिखांत बघणारा हरखून जाई , कुठे फांदी-? याच भ्रमात, फूल अन् फूल उमले, जागा नाही कुठे उगवण्या लेकुरवाळ्या फांदीलाही, अभिमान वाटे मिरवण्यां, फुले […]

हिरव्या पानात लगडलो

हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो, स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या, गोऱ्या रंगावरी आमुच्या, जनहो नका हो भाळू, टपोरेआकार पाहुनी, मोहून नका हो हाताळू, कौमार्य फुलते आमचे, दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद, मगच उमलेल फूल हे सुंदर , येईल मोगऱ्याला बहर, स्पर्श न करता नेत्रसुख घेता, घ्या हो आमुचा आस्वाद, किती […]

झाडांची आज चालली रंगपंचमी

झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ, विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी कुणी गडद, कोणी लालेलाल झाला बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला कोणता अधिक सुंदर ते विचार करे माझा रंग बिनतोड’, ते पक्के ठरवे मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,– निसर्गघटक कितीतरी, असती, कोण दाखवेल असे औदार्य,–? एकट्या […]

लाटांचा न्यारा स्वभाव

लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती, खडी एक भिंत बनवत, सागरात उभ्या राहती, थेंबांची नक्षी हालती, पुढेमागे होती मोती,–!!! पुन्हा पुन्हा खेळत खेळत , मजेत धुंदीतनाचत– नाचत, एकमेकींवर आदळत आपटत, किती संख्येने उभ्या राहती,–!!! सागर मात्र शांत राही, लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत, कसा काय तटस्थ राही,–!!! शांतता धीरगंभीरता, आणतो तरी कुठून एवढी, […]

असे कसे विसरलास,

असे कसे विसरलास,आपुल्यातील गोड नाते, माझे,होते ना तुझे, तुझे असायचे रे माझे,–!!! जीव तुझा कासावीस, होई मला उलघाल, मनाचे सोड, तनाचे, मग सोसते हाल-हाल,–!!! प्रीतीची हूल तुझ्या, कशी गावीही नाही,— बनशी असा रुक्ष की, प्रेमाचा लवलेशही नाही,–!!! तरल, मृदू, नाजूक, प्रीत पुन्हा कधी फुलेल, शेजेवरील मोगरा, पुन्हा कधी बहरेल,-? तारुण्याचा बहर आपुला, पुरता नाही ओसरला, तरीही […]

1 17 18 19 20 21 30