नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

तारकांचे पुंज माळून

तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे, दुःखांच्या आभाळीही, मुक्त बघ जरा हिंडावे,–!!! घायाळ जीव तो आंत आंत, तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला, दिलासा कसा कुशीत द्यावा,–!! ओढ नसावी शरीरातून, असावी प्रीत मनामनांची, धागे एकमेकांत गुंफत, वीण गुंतावी काळजांची,–!!! तुझे दुःख माझ्या उरात सले, माझे व्हावे ना रे तुझे, अश्रू माझे गाली सांडताना, राजा,अंतर मात्र […]

केला एवढा अट्टाहास

केला एवढा अट्टाहास,रसिका केवळ तुझ्यासाठी, मांडली काव्याची आरास, तुझ्याच फक्त आशीर्वादासाठी, दत्तगुरूंचे धरून बोट, लेक लिहीत गेली, आईवडील, भाषाईने, समृद्धी तिज दिधली,–!!! माया करती मित्रवर्य, शिक्षकांचे आशीर्वाद मागुती, असे संस्कार,सहकार्य, उभे राहिले बघा पाठी,–!!! काव्यप्रेमी देती दाद, त्यांची ममताच उदंड, पावती देती रसिक, कृपा त्यांची भरभरून, –!!! त्यांच्या सदिच्छा-भेटी, पत्रे शिवाय, संदेश खास, खाऊ, फुले, आशीर्वादाची, […]

आहे तेच स्वीकारावे

का असे जगणे होते, भलतेच कधी जीवघेणे, वेदनांचे उठती टाहो, आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे, सहावे कुठवर, सोडून द्यावे, जखमी घायाळपण लपवावे, कोण त्राता, कोण करविता, संभ्रमी सारे जीव पडावे, अगदी अनाकलनीय ना, आपल्या आयुष्याचे कोडे , त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,–!!! संयम, नि संतुलन किती, जागोजागी का दाखवावे, माणूस म्हणून जगणे मग, शेवट यंत्रवतच”” बनावे, […]

ग्रीष्माची काहिली सोसता

ग्रीष्माची काहिली सोसता, धरणीला संजीवन -डोहाळे, संततधार वरुन बरसतां, तनी–मनी तिच्या पावसाळे,–!!! निराळीच प्रीतीची तऱ्हा, प्रेम असते आगळे, थेट भिडे ती गगनां, सृष्टीचे शृंगारलेणे,–!!! प्रणयाची रीत पहा, गगन धरतीवरी झुके, आपुले देणे देई धरा, प्रेम बोलके असून मुके,–!!! गगन गाजवी पुरुषार्थ, काम क्रोध मोहा,— वसुंधरा स्त्रीच शेवट, निमूट करते संसारा, ऋतू पालट होता होता, पृथा गर्भार […]

का मागे, मागे वळून पाहशी

विसर सर्व गतकाळां, उगा मना रेगांळशी, पुढे जाऊन, समोर पहा ,;— का मागे, मागे वळून पाहशी,—!!! मागे राहिला बालपणा, त्यात कशाला हुंदडशी चार सुखाचे थेंब दिसतां सारे आभाळ पुन्हा पेलशी,–!!! कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी, पाहून आपल्या भूतकाळां, पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,–!!! घरात माणसांचा राबता, सांग आता कुठून आणशी, अशा अनमोल दौलतीला, तूच ना रे […]

अनुवादात्मक

सारखा संघर्ष करत करत, अंतर्मन तुटून जाई, सुखाचे भरभरून समुद्र मग भले मिळोत कितीही,— किती त्याला अर्थ नाही,–? अशा जीवनात अर्थच नाही,–? पाण्यावाचून कोरडे, पडत, पीक सारखे गळत राही, मग पडत राहिला पाऊस, किती त्याला अर्थ नाही,–? अशा जगण्याला अर्थ नाही,–? किती मोठा असे परिवार, करत असेल जर दुःखी, हे असले कसले संबंध,–? करती मने दूषित […]

नभांगणी आज मेघ

नभांगणी आज मेघ, कुठून कुठे चालले, शेकडो योजने प्रवास त्यांचा, कोणी त्याला मापिले,–!! निळे काळे भरले ढग, एकत्र जमून पुढे चालले स्वैर विहरती त्यात विहग, लांबवरी ते उडत चालले,–!!! या मेघांची बनते माला, इकडून तिकडून सर्व बाजूला, जसा लवाजम्यात घोळका, निघाला तसा काफिला,–!!! मध्येच एखादा मेघ डोकावे, संजीवनाने ओथंबलेला, अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,–!!! कोणाची […]

निघून जरी जाशी

निघून जरी जाशी,— मम आयुष्यातुनी तू , तरी सारखा मागे उरशी, लपलेल्या अंत:करणी तू ,— तीर जसा वेगे शिरतो, घायाळ करत अचानक, तसा तू बाण बनतो, छेद आरपार देत,–!!! तो जसा बंबाळ करी, पर्वा ना त्याला कुठली, कोण त्याला थोपवी, न कुणी त्यावर मात करी, तसेच तुझे घुसणे,– मम हृदयी, आंत आंत, कितीदा नव्याने पुन्हा जगावे […]

काळ्याशार तमांमध्ये

काळ्याशार तमांमध्ये, पाणीही बनते कुट्ट काळे, रंग खेळती मजेत तिथे, पंचमीची क्रीडा चाले,– पिवळसर, सोनेरी, हिरवटसे, विचरती पाण्यात रांगेने, बिंदू सारे प्रतिबिंबित कसे, पाहती डोकावून,उत्कंठेने,–!!! वाकून खाली सगळे जरासे,— प्रतिमा आपुलीच न्याहळत, घेती धडे एकरुपतेचे,–, पुढे पुढे सरकत,सरकत, एक दुसऱ्यात असा मिसळे, एकत्रीकरण जणू कंगोऱ्यांचे,–!!! विविधरंगी त्यांची दुनिया, मूळ रंग मात्र एकच असे, विविधतेतून एकता ना, […]

भेटीची आस तुझ्या

भेटीची आस तुझ्या, नित्य मज छळते , तुझ्यासाठी सखया, रात्रंदिन मी झुरते,–!!! चित्र पाहूनी तुझे, जिवाची ओढ लागते, जन्मोजन्मीचे नाते असता, कशी हुरहुर वाढते,–!!! थेट अंतरातुनी मला, जसे तुझे बोलावणे, घालमेल होता जीवा, आतल्या आत लपवते,–!!! जेव्हा कल्पते एकांता, माझी न मी राहते, तुझ्यासंगे भान हरपता, वास्तवालाच मी विसरते,–!!! मनाचा हा ओढा, कसाबसा रे दडवते, आतल्या […]

1 10 11 12 13 14 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..