नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

विचार आतला…

विचार आतला, काळोख दाटला, उजळत्या घरां, आत्मा पाहिला,–!!! चिंता दु:खे, बोचरी सुखे, विलक्षण खंता, हृदयाला भिडतां,–!!! मी तूपणा गळतां, अंतरात्मा छळता, प्राणातील परमात्मा, मोक्ष मागतां,–!!! जीव सुटेना, कर्मात,भोगात, अडकून राहिला, दार उघडतां,–!!! मुक्काम बदलतां, नसते हातां, व्यथा हृदयां, जिवा छळतां,–!!! स्वर्ग-नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा-नकोशा,–!!! © हिमगौरी कर्वे

पण आणि परंतु….

पण आणि परंतु, मध्ये सारखे येती, निर्माण करती किंतू , जीवनही ते बिघडवती –!!! गोष्ट कुठली सरळ , आयुष्यात होत नाही, प्रत्येकाचे त्यांच्यावाचून , पदोपदी अडत राही,–!!! सुख– दु:खांची असो भेळ, असो अडसर भोवती, मार्ग नसण्यात निव्वळ चोख भूमिका निभावती,–!!! ते नसते तर आयुष्याची, मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,–! […]

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते….

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते, उतरायचे जमिनीवरी, कधीतरी ते होणार असते,–!!! उंच — उंच झोके घेऊनी, उडत राहतो निळ्या आभाळी, त्याचाच सारखा वेध घेत, स्वारी वर कशी पोहोचते,–!!! उंच, उदंड त्या गगनी, सुखद गारव्याची मजा असते, इकडून तिकडे विहरत राहून, धुंदी कशी पहा चढते,–!!! जमीन भासे अगदी छोटी, तुच्छ सारी दुनिया वाटते, लाथ मारून […]

उत्फुल्ल झाली जास्वंद

उत्फुल्ल झाली जास्वंद, केवढी ही तिची मिजास,-? वाऱ्यावर उठते डंवरून, झाडाभोवती जशी आरास,–!!! लालचुटुक रंग तिचा, जिवाचा आपल्या ठांव घेई, टपोरे फुलते फूल जसे, फांदीवर झोके घेई,–!!! सुंदर रंगसंगती केवळ, निसर्गराजाचाच वास, कुठलाही ना तिला गंध, तरीही भासे जणू खास,–!!! आखीव रेखीव पाकळ्या, गडद रंगी उमललेल्या, भुंगे अधीर पराग टिपण्या, इतक्या पहा मुसमुसलेल्या,–!!! बिंदू छोटे पिवळे […]

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले..

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले, भय भीती ना डर, लाटांशी खेळत निघाले,—!!! समुद्री उठे लाट, अलगद पायात येते, तिलाच खेळणे समजून, पिल्लू नाचत राहते,—–!!! क्षणभर बावरून, एकदा वळून बघते, टाकत पुढे आपले पाय, घराकडे कसे निघते,—!!! फेसाळत आता समोर, समुद्र स्वागत करे, जणू लेकरू बघून, आनंद गगनी न मावे,—!!! तो असीम अथांग, अपार, पिल्लाला धाशत नसे, […]

खेळ केवढा चाललेला

खेळ केवढा चाललेला, या दुनियेच्या पटावरती, पर्याय नसे सोंगट्यांना, कळसूत्री बाहुल्या हलती,–!!! जेजे घडे, मागे त्या, कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,–! कोण घडवी सगळ्या घटना, मदत करी अडल्या प्रसंगी, असंख्य रूपे तुझी देवा, दिसती आम्हा समयी समयी,–!!! करुणा शांती क्षमा, प्रेम, दया, भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा, […]

नभांगणी मेघ जमू लागले

नभांगणी मेघ जमू लागले, बघतां बघतां, बरसू लागले, तुझ्यासाठी रे नयन, असे सतत तरसू लागले,–!!! धरणी संजीवनात नहाते, अंगांग तिचे जसे भिजे, प्रेमवर्षावी तुझ्या बघ, पंचप्राण तसे आसुसले,–!!! वाऱ्यावादळांनी होई जसे, रोमांचित तन धरणीचे, तसेच तुझे येणे भास कणकण उठती शहाऱ्यांचे-!!! धरणीचे स्वरूपच हिरवे, तरो -ताजेपण तिचे, काया होत टवटवीत, तसेच हिरवेपण भरले,–!!! माझे स्त्रीत्व,; तुझे […]

असे निसर्गाचे चक्र

रोपट्याचे होते झाड, झाडाचा होतो वृक्ष, वृक्षातून मिळते बी, असे निसर्गाचे चक्र, –!!! पाण्याची होते वाफ, वाफेचे होतात ढग, ढगांचे पुन्हा पाणी, असे निसर्गाचे चक्र,–!!! सृष्टी मातीतून जन्मे, चराचरातील घटक, घटकांचे होते विसर्जन, मातीत जातात मिळून, असे निसर्गाचे चक्र,–!!! जन्मतात किती झरे, जाऊन मिळती नदीला, नदी एकरूप सागराशी, सागरांतुनी पुनश्च वाफ, असे निसर्गाचे चक्र,-!!! कचऱ्याचे होते […]

काय हाती सरतेशेवटी

काय हाती सरतेशेवटी, जीवन पुढे पुढे जाते, करत रहावी पुढची बेगमी, पैलाची वाट बोलावते,–!!! या तीरावरून त्या तीरी, पोहोचणे असते का सोपे, ऐलाची हाक सतत कानी, मध्ये उगी खेचती भोवरे,–!!! ऐहिकाची ओढ राही, पाणी ढकलत राहते, लौकिकाचा छळ नशिबी, तनमन गटांगळ्या खाते,–!!! स्वर्गच जणू पैलतीरी, नरकातून वाहत जाणे, सुख- दु:खांनी श्वास कोंडती, हेलकाव्यांचेच ते जिणें,–!!! मरण […]

कळ्या नाजुकशा

कळ्या नाजुकशा, फुलल्या तुझ्यासाठी,–!!! गगनी चांदण्या, आल्या तुझ्यासाठी,–!!! घमघमणाऱ्या केवड्या, सुगंध तुझ्यासाठी,–!!! आरक्त प्राजक्ता, पखरले तुझ्यासाठी,–!!! दिमाखदार चाफ्या, लुटले तुझ्यासाठी,–!!! मदमस्त मोगऱ्या, खुडले तुझ्यासाठी,–!!! बकुळां,अर्धमिटल्या, वेचले तुझ्यासाठी,–!!! सायलीच्या सुगंधा, मोहित तुझ्यासाठी,–!!! अबोलीच्या वेण्या, माळल्या तुझ्यासाठी,–!!! मंद- मंद रातराण्या, उमलल्या तुझ्यासाठी,–!!! यामिनीला ढळत्या, मातले तुझ्यासाठी,–!!! आलिंगनात तुझ्या, सहज विरघळण्यासाठी,–!!! © हिमगौरी कर्वे

1 9 10 11 12 13 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..