Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche

मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ?

मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ? माझा बाप म्हणतो… लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं… मी मनात म्हणतो बापाला… तुम्ही आम्हालाच काढलं नसत तर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला… लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतात किती हा मूर्खपणा ? ती तर लग्न न करताही […]

तू…

तू कोणाची का होईना तुझ्या हृदयातील एक जागा मोकळी राहायलाच हवी… मी जिवंत असेपर्यत तुला माझी आठवण यायलाच हवी … मला गमावल्याची किंमत तुला काळायलाच हवी … माझ्या समोर येता तुझी नजर झुकायलाच हवी… तुझ्या आयुष्यात एकदा तू माझी मदत मागायलाच हवी… माझे सर्वस्व पणाला लावून मी ती तुला करायलाच हवी… कवी – निलेश बामणे, ( […]

वेदना…

मी काल दिलेल्या वेदना आज भोगतोय… मला आज दिलेल्या वेदना तू उद्या भोगशील… वेदनांचा हा जमाखर्च आता असाच सुरु राहणार… चेहऱ्यावर हसू असणार आणि हृदय जळत राहणार… शरीर झिजत जाणार मन तरुणच राहणार… शरीर नष्ट होणार पण वेदना तशीच राहणार… वेदनेचे गणित पुन्हा कोणी दुसरे मांडणार… या जगात शेवटी वेदना वेदनाच राहणार… – निलेश बामणे ( […]

प्रसिद्धी

वर्तमानकाळात उभा राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ मी दोन्ही पाहतोय… भूतकाळ बरा होता , भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय… मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय… त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय माझी प्रसिद्धी ! माझ्या प्रेयसीचा हात हातात घेऊन… मी प्रेमाची शिक्षा भोगतोय आतल्या आत गुदमरतोय… निलेश बामणे ( बी डी एन )

धागा

तू काय ? ती काय ? मी काय ? सारेच एका माळेचे मणी वेगवेगळ्या रंगाचे एकाच धाग्यात गुंफलेले कोणी आधी गुंफलेले कोणी नंतर धागा तुटता सारेच पसरलेले अपघाने दोन मणी जवळ येतात हलकासा वारा येताच विलग होण्यासाठी … ©निलेश बामणे

स्वप्ने

तुझी स्वप्ने तू जग माझी स्वप्ने मी जगतो भेटूच आपण एकदा स्वप्नांचा हिशेब मांडायला सारखी स्वप्ने वजा करू उरलेली मिळून पूर्ण करू ©निलेश बामणे

भुंगा

त्यानेच घातला भुंगा डोक्यात माझ्या तिच्या प्रेमात पडण्याचा… स्वतःच्या पायावर स्वतः च्या हाताने धोंडा मारून घेण्याचा… सभोवताली असताना मादक पऱ्या तिच्या प्रेमात पडण्याचा… मनात नसतांना तिच्या काही तिच्यात गुंतून पडण्याचा… आला योग जीवनात माझ्या प्रेमाची शिक्षा भोगण्याचा… कवी – निलेश बामणे ( बी डी एन )

त्याची मर्जी

काडीही हलत नाही त्याच्या मर्जीशिवाय आणि मी जग बदलू पाहतोय ! काडी हलण्यालाही वारा निमित्त असतो आणि मी स्वतःला बदलू पाहतोय ! मी शांत आणि स्थिर राहतो तो माझी परीक्षा घेऊ पाहतोय ! माझे प्रेम आणि तिचे प्रेम एकत्र करू पाहतोय! त्याची मर्जी मी स्वीकारताना आता तो पाहतोय ! कवी – निलेश बामणे ( बी डी […]

माझ्या कविता

माझ्या कविता वाचून माझ्या प्रेमात पडू नकोस विचार मला त्या कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ… माझ्या कवितेची प्रत्येक ओळ आहे एक प्रेम मंत्र जीवनातील एक रहस्य न सुटलेल्या साऱ्या कोड्यांचं उत्तर… प्रेमात पडणं सोप्प असत पण जगण अवघड ते अवघड सोप्प कस करायचं ते सांगते ती माझी कविता… म्हणून माझ्या कविता वाचून माझ्या प्रेमात पडू नकोस माझ्या […]

1 2 3 4 31