नवीन लेखन...
नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

प्रथम आम्ही भारतीय आहोत..!

प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…! भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’ भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची […]

गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले […]

कुतुबमिनार “एका क्रूर आक्रमणाचे वास्तव सत्य !”

परकीय आक्रमकांच्या क्रूरतेला आणि फितुरांच्या कटकारस्थानाला, संघटीत शक्तीनिशी विरोध झाला असता तर आज श्रीविष्णू मंदिराच्या ठिकाणी कुतुबमिनार उभे नसते. प्राचीन भारतीय हेमाडपंथी शैलीची मंदिरे पाहिल्यास आपल्याला उत्कृष्ट कलेची ओळख होते. कुतुबमिनार पाहतांना मात्र क्रूर आक्रमकांनी केलेल्या दुष्कृत्यांची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. परिसरात बारकाईने लक्ष दिल्यास प्राचीन मंदिराचे हेमाडपंथी अवशेष दिसतात. तेथील हेमाडपंथी अवशेष, लोहस्तंभ तसेच शिलालेखावरून […]

अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.
[…]

कंटकारी / डोर्ली …एक अनुपम्य औषधी..!

आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात, परंतु त्यांच्या उपयोगाबाबत माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतींना कचरा समजून बसतो. ह्याच वनस्पतींच्या माध्यमातून औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या योग्य उपयोग करून लाखो रुपये कमवितात. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत, ग्रामीण जनता अनभिज्ञ असल्याने त्याचा जोड-व्यवसायासारखा उपयोग करत नाही. पर्यायाने औषधी खरेदी करतांना अनावश्यक किंमत मोजावी लागते. सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींच्या […]

वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो. […]

चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’

महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.

” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |

अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )

प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल. […]

शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..