माती

माती *अष्टाक्षरी ओवी* शिर्षक *मृदा* मृदा तुझी रुपे भिन्न चिकण,तांबडी,छान पिके खुप तिथे अन्न माती द्यावा मान पान ।।१।। राबती तुझी लेकरे अहोरात्र सेवा करी खत पाणी ही देत रे सोनं येई घरो घरी ।।२।। मातीचा टिळा लाविती बळी राजा तुझे भुषण नाही उतत,मातत तुच त्याचे आभुषण ।।३।। हा सुगीच्या दिवसात आनंद पर्वणी खास चीज होता […]

मी वाचणारच (ओवीबद्ध रचना)

मला वाचवा वाचवा नका खुडू हो या जीवा जग आम्हा ही दाखवा मी मोलाचा ठेवा।।१।। अधिकार जन्मायचा आशिर्वाद ईश्वराचा हक्क स्वप्न बघायचा का हिसकावता।।२।। मी देशाचा अभिमान हवा तुम्हा स्वाभिमान कराल माझा सन्मान प्रजा टिकवाल।।३।। जगा आणि जगू द्या हो दिवा विझता इथे हो पणती कामा येई हो तिला जगवा हो।।४।। मी धडपडणारच मी जगी वाचणारच […]

संक्रांत

तिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२०

परिवर्तन

नित्य नेमेची पावसाळा पुन्हा हिवाळा उन्हाळा परिवर्तन नियम सृष्टीचा विविधतेचा गोतावळा ।।१।। विविधतेचा गोतावळा परिवर्तित होतो डोलारा फुलताच लतिका साऱ्या जिथे तिथे फुले फुलोरा ।।२।। जिथे तिथे फुले फुलोरा तंत्रज्ञानाने जीवन बदला जुने असतेच सोने हो नव्यात हिरा असे दडला ।।३।। नव्यात असे हिरा दडला म्हणून जुन्याचा हट्ट सोडा परिवर्तनात हित साधा जुन्या बरोबर नविन जोडा।।४।। […]

जेव्हा लेखणी बोलते

(१) जेव्हा लेखणी बोलते भाव मनीचे सांगते सत्य प्रकाशी करते नवे साहित्य योजते (२) जेव्हा लेखणी बोलते शस्त्रा सम ती भासते गुपित उलगडते मनीची व्यथा मांडते (३) जेव्हा लेखणी बोलते साहित्य शब्दी डोलते अंतरंगी झेपावते स्वैर नभी संचरते (४) जेव्हा लेखणी बोलते शब्दबाग फुलवते स्व-गंधी दरवळते सारस्वतात धुंदते (५) जेव्हा लेखणी बोलते काव्यसरिता वाहते हक्कासाठी ती […]

मोहरली ही लेखणी (ओवीबद्ध रचना)

मोहरली ही लेखणी काव्यात नित्य रमली लेखणी माझी देखणी काव्य सुमे स्फुरली ।।१।। परखड बोलते ही शब्दवार करते ही झरझर स्त्रवते ही जहाल वाटते ही ।।२।। तोलून मापून भाव योजून मोजून घाव व्यक्त होई भरधाव जपूनच हो राव ।।३।। अग्रलेख नित्य लिही कधी ललित लेख ही भारुड,गवळण ही रचे छान ओवी ही ।।४।। सौ.माणिक शुरजोशी नाशिक

अंतरपाट (लघुकथा)

अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं. कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती. […]

सय माहेराची (ओवीबद्ध रचना)

सय माहेराची येते मन झुलते झुलते क्षणात माहेरी जाते मी तिथेच रमते।।१।। आहे प्रेमाचे आगर तिथे मायेचा सागर घडे प्रितीचा जागर हा बंधू भगिनीत।।२।। हे केवड्याचे कणीस सुगंध रातराणीस बकुळ माळे वेणीस परसदार खास।।३।। मित्र मैत्रिणींचा मेळा जमतो ना वेळोवेळा झिम्मा फुगडीही खेळा हा मैत्रीचा सोहळा।।४।। आई माझी सुगरण करी पुरण वरण मिळे स्वादिष्ट भोजन अगत्याचे […]

पोशिंदा

दिनरात कष्ट करी शेतामधे राबतो मी धनधान्य पिकवितो तुम्हा सर्वा पोसतो मी ।।१।। लोक म्हणती पोशिंदा उभ्या जगाला तारतो कष्ट दैवत बळीचे भार नित्य उचलतो ।।२।। खांद्यावरी लाकडाची मोळी माझी सखी झाली विकुनिया चार पैसे मिळताच सुखं आली ।।३।। घर्म धारा गळतात गालफडं बसतात डाव सारे फसतात कर्ज फार असतात ।।४।। नाही खंत मला त्याची फेडणार […]

बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)

इवलेसे लहानसे होते विश्व ते छानसे चार भिंतितले कसे ते मोरपंखी जसे।।१।। मनमानी वागायचे हवे तेव्हा उठायचे दिस कोड कौतुकाचे पिलू आई-बाबांचे।।२।। भोकाड पसरायचे लोटांगण घालायचे ढोंगी बगळा व्हायचे खोटच रडायचे।।३।। पोट दुखतं म्हणावे घरी खुशाल लोळावे आईच्या मागे फिरावे अभ्यासाला टाळावे।।४।। बालपणी रमतांना गमती आठवतांना खुप खुप हसतांना गंमत वाटतेना।।५।। सौ.माणिक शुरजोशी

1 2 3 4 5 12