नवीन लेखन...

अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. […]

विठ्ठल नामाचा गजर

कला अकादमीची अखिल गोवा भजनी स्पर्धा ही भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली जाते. 1979 साली मनोहरबुवा शिरगावकर कैलासवासी झाले. मनोहरबुवांच्या स्मरणार्थ कला अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष व गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या सूचनेवरून कला अकादमीने भजन स्पर्धा गोव्यात सुरू केली. […]

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..