नवीन लेखन...
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

नवाझ शरीफ यांच्या विजयानंतर भारत-पाक संबंधांत नवे पर्व हा भाबडा आशावाद

फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पाकिस्तानी मतदारांनी नवाझ शरीफ यांना निवडून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांचे नवे पर्व सुरू होईल असा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या. एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्‍या लोकनियुक्त सरकारकडे मतपेटीद्वारे झालेले हे देशातील पहिले सत्तांतर आहे.
[…]

आपल्याच भूमीतून आपले लष्कर मागे घेऊन चीनपुढे गुडघे टेकले?

चीन सीमेवर २१ दिवसांपासून असलेला तणाव दूर करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने चीनच्या हट्टापुढे गुडघे टेकले. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.चीनने भारताच्या हद्दीत दौलत बेग ओल्डी क्षेत्रात १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी करुन लष्करी चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते.
[…]

पाकिस्तानी तुरुंगांमधले भारतीय सैनिक आणि इतर कैद्यांची सरकारकडून सदैव उपेक्षा

आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ६,५६९ भारतीय डांबले गेले आहे. सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांत तुरुंगांमध्ये कैद आहे. यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) व संयुक्त अरब अमिराती (१०१२),बांग्लादेश – ६२, अफगाणिस्तान – २८, बहारिन – १८,  आणी पाकिस्तान ५३५ (४८३ कोळी) यांचा समावेश आहे. १९७१ च्या लढाई नंतर आपण ९४,००० पाकिस्तानी सैनिक सोडुन दिले पण आजपण ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानी तुरुंगांमध्ये आहेत.
[…]

चीनची घुसखोरी आणि आमचे कमकुवत, गोंधळलेले आणि भित्रे सरकार

चिनी लष्कराने भारतीय हद्दीत १० कि.मी.पर्यंत घुसखोरी केली आहे त्याचा आज १४ वा दिवस आहे. थेट तंबू ठोकून घुसखोरी करणार्‍या चीनने लडाखमधून माघार घेण्यासाठी भारतासमोरच आधी चौक्या हटवण्याची अट ठेवली आहे.
[…]

जर्मन बेकरी पुणे, हैदराबाद ते बंगळुरू : दहशतवादी हिंसाचार वाढवण्याची शक्यता

राज्य विधानसभा निवडणुकीला जोर आलेला असतानाच बुधवारी मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा या घातपातामध्ये हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
[…]

जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी

जागतिक आर्थिक महासत्तेची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वेळप्रसंगी एकाधिकारशाहीच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध झिडकारण्यातही ते मागे-पुढे पाहणार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत बँकेच्या मूळ भांडवलापासून ते आकस्मिक निधीपर्यंत जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी आता पाहायला मिळणार आहे.
[…]

नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा आणि नक्षल नवजीवन योजना

नक्षलग्रस्त भागांत भारताची सत्ता चालत नाही. पाकव्याप्त काश्मिरप्रमाणेच या प्रदेशांची अवस्था बनलेली आहे. नक्षल चीनचे भारतात नेमले गेलेले सैनिक आहेत. त्यांना होणारा शस्त्रास्त्र पुरवठा पूर्वोत्तर राज्यांच्या सीमांवरुन केला जातो.
[…]

पाकिस्तानमध्ये राजकीय नेते आणि हुकूमशाह यांच्या हत्याकांडाची परंपरा

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक दीड महिन्यांवर आली असताना सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वातच तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाचे प्रमुख व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो-झरदारी हे देश सोडून थेट दुबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रचार मोहिमेस मोठा धक्का बसला आहे.
[…]

दहशतवादी आत्मसर्मपण आणि पुनर्वसन धोरण :समन्वयाचा अभाव

घातपाताचा कट रचल्याप्रकरणी ‘हिज्ब-उल-मुजाहदीन’चा अतिरेकी लियाकत अली शाह याला दिल्ली पोलिसांनी अटक

केल्याच्या मुद्द्यावर जम्मू-काश्मीर विधिमंडळ सभागृहात चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेल्या तहकुबीच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली.


[…]

जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या प्रकारचा दहशतवाद

1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते.
[…]

1 24 25 26 27 28 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..