नवीन लेखन...
गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

संकर आणि संकरित प्रजाती

पृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात, सध्याच्या वेगानं संकर होत राहिला तर कदाचित, हजारो वर्षानंतर, अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील. मानवाच्या बाबतीत, सर्व मानववंशात संकर होअून, कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव? त्या संमिश्र प्रजाती? पण तोच खरा `पृथ्वीमानव` असेल आणि पृथ्वीवरील त्याच पृथ्वीप्रजाती असतील. […]

खटकणारी आडनावं बदलण्याचे काही अुपाय

कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात. […]

राष्ट्रीय विज्ञान दिवस

सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. […]

कायमस्वरूपी कचरा आगाराची संकल्पना

गावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे. […]

सणवार आणि पर्यावरण

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. […]

मुंबअीचे डबेवाले आणि तीर्थक्षेत्रीचे बडवे

मुंबअीचे डबेवाले फार शिकलेले नसतात. साधा पेहराव, साधी राहणी, कपाळी लाल गंध, डोक्यावर पांढरी खादी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा खाक्या असतो. […]

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान : पूर्ण ब्रम्ह.

आपलं अध्यात्म गेल्या सुमारे ५००० वर्षांपासून गोठलं आहे. त्यात अुत्क्रांती झालीच नाही. आता विज्ञानानं, निसर्गासंबंधी, विश्वासंबंधी आणि सजीवांसंबंधी, खूप आणि खात्रीपूर्ण माहिती मिळविली आहे. विज्ञानाचे निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळवून आणल्यास, कुणालाही, केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात. या महितीचा अुपयोग करून आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना नव्यानं पुष्टी देणं शक्य आहे. […]

विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर

विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्‍याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]

विज्ञान मराठी : पारिभाषिक संज्ञा

रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे. […]

मराठी भाषा आणि लिपी समृध्दी

या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..