नवीन लेखन...
Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

टपाल पेटी…

तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा. […]

कार्यक्रमाचा कार्यक्रम…

आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो. कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या. […]

तार.. तार…!

तुमच्या माझ्या आयुष्यात येणारा आणि सतत पाहिला जाणारा घटक म्हणजे तार. आपल्या सर्वांच्या आयुष्यात तसं म्हणायला गेलं तर तारेचा कितीसा उपयोग आहे, असं विचारलं तर काहीच नाही, असंच काहीस उत्तर पटकन येतं. पण जेव्हा आपण थोडसं डोळसपणे हे जाणून घ्यायला लागलो की डोळ्यांनी न दिसणाऱ्या तारेच महत्व आपल्याला पटु लागतं. […]

आज आत्महत्या नाही का ?

समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो. […]

कल्हईवाला…

आज हे सारे आठवण्याचं कारण म्हणजे… घरातला शेवटचा पितळी तांब्या देण्यासाठी बाहेर काढला गेला होता. हा तांब्या मोडमध्ये देऊन स्टिलचे कुठलेतरी भांडे घेण्याची योजना आखली गेली होती. त्या पितळी तांब्याला पाहून कल्हईवाला चाचा आठवला. पितळी तांब्याला चिकटलेले सारे जुने संदर्भ आठवले आणि आठवणी समोर उभ्या ठाकल्या…. […]

दगड

लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..
[…]

आपण सारे संजय…

दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. […]

भिंत

माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे. […]

नाम गुम जायेगा…

आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे… […]

पुस्तक म्हणालं…

पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..