नवीन लेखन...
Avatar
About दासू भगत
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

माया नगरीची एक साक्षीदार 

जे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस.? माझ्या बरोबर […]

रहे ना रहे हम : रोशन

रेडिओ सिलोन, विविध भारती व ऑल इंडिया रेडिओ या आकाशवाणी केंद्रानी आपल्या देशातील संगीताची विशेषत: चित्रपट संगीताची जेवढी भूक भागवली असेल तेवढी आजतागयत कोणत्याही रेडिओ केंद्राने भागवली असेल असे मला तरी वाटत नाही. एक संपूर्ण पिढी या संगीतावर पोसलेली आढळून येईल. मी तर धाडसाने असे म्हणेन की या संगीताने आमच्या काळातील पिढीला कधीही आत्महत्येचा विचार मनात […]

अस्सल मातीतला अभिनेता : निळू फूले

कथा, कादंबरी, नाटक,कविता… साहित्य प्रकार कुठलाही असो त्यातील शब्द हेच महत्वाचं हत्यार असतं. या हत्याराला वाक्यांची दमदार मूठ लावली की साहित्यातली शब्दकळा फुलू लागते. प्रतिभावान लेखक कवी मग एक ओघवती भाषशैली निर्माण करतो आणि आपण त्यात गुंतून जातो. मात्र चित्रपटात फक्त अशी भाषा असून चालत नाही कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात कथा कादंबरी सारखे हवे […]

चित्रपटसृष्टीतला जमीनदार : बिमल रॉय

सरंजामशाही, हुकूमशाही, राजे शाही वा जमिनदारी या सर्वच शोषणावर उभ्या असतात. त्यामुळे या व्यवस्थेतील माणसे बहूतांशी संवेदनहीन असतात… हे एक वैश्विक सत्य आहे आणि हे वास्तव आपण नाकारण्यात अर्थ नाही. प्राचीन काळा पासून भारतीय समाज या सर्वाचाचं अनुभवही घेत आला आहे. ब्रिटीश वसाहतवादी होते व त्यांना आपले साम्राज्य जगभर पसरवायचे होते. ते दूरदर्शी व चलाखही होते […]

खलनायक नही नायक हूं मै : प्राण

आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त व्हायला आणखी २७ वर्षांचा कालावधी होता. दिल्लीतल्या बल्लीमारन या वस्तीत नेहमी प्रमाणेच धावपळ असायची. माणसांची गर्दी, कामाच्या ओढीने बाहेर पडणारे जथ्थे, हातगाडी वाले, मध्येच वाजणाऱ्या सायकलरिक्षांच्या घंटा वगैरे..काहीशा अंधारलेल्या या गल्लीच्या शेवटी काही जुन्या उदासिन हवेल्या पण होत्या. आताही आहेत. अशा प्रकारची एकतरी गल्ली भारतातील सर्वच शहरात आजही आढळते. “सौदागरन” अशी […]

वजनदार सुराची टूणटूण

इतरांच्या शारीरीक व्यंगावर हसणे या सारखे दळभद्री काम जगात कोणतेच नसेल. स्वत:ची खिल्ली उडवणे किंवा आपल्यावरच व्यंग कसणे ही अत्यंत अवघड गोष्ट. चार्ली चॅप्लीनने तर स्वत:चीच इतक्या टोकादार पणे खिल्ली उडवली की तो आमच्याच वर्मावर घाव घालत होता हे आम्हाला कळलेच नाही. लॉरेल हर्डी या शारीरीक विजोड जोडीने आम्हाला खदखदून हसवले. भारतीय चित्रपटसृष्टीत देखिल असे अनेक […]

चिर तरूण सदा बहार : जोहरा सैगल

काही काही माणसं बहूदा जन्मताच बंडखोर असतात. सर्वमान्य प्रचलीत रिती परंपंरा वा चौकटीबद्ध आचरण त्यांच्या स्वभावातच नसते. लोक काहीही म्हणोत ते आपला मार्ग सोडत नाहीत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत तर असे आभावानेच आढळते. विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या रूढीवादी कुटूंबात जर असे कोणी वागत असेल तर महा कठीण…..उत्तर प्रदेशातील साहिबज़ादी ज़ोहरा बेगम मुमताज़ उल्लाह खान हीचा जन्म झाला […]

जाने वो कैसे लोग थे – गुरूदत्त

चित्रपटातील गाणे उत्कृष्टपणे कसे चित्रीत करावे यासाठी प्रसिद्ध असणारे दोन नावे म्हणजे विजय आनंद आणि गुरूदत्त. प्यासा मधील जाने वो कैसे लोग थे जिनको…..या गाणे जर बारकाईने न्याहळले तर झूम इन आणि झूम आऊट या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. […]

हिरो नव्हे अभिनेता : संजीवकुमार

७० च्या दशकातील ही घटना आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक ए.भिमसिंग हे दिलिपकुमार यांच्याकडे चित्रपटाचा एक प्रस्ताव घेऊन् गेले. ए.पी. नागराजन हे प्रसिद्ध तामिळ लेखक-दिग्दर्शक त्यांचे मित्र. त्यांनी १९६४ मध्ये शिवाजी गणेशन् यानां घेऊन “नवरात्री” हा चित्रपट तयार केला होता. ए.भिमसिंग यानां या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायचा होता. दिलीपकुमार यांनी पटकथा लक्षपूर्वक वाचली आणि ते म्हणाले- “हा […]

संगीतावर प्रचंड विश्वास असलेले : अनिल विश्वास

एखादी घटना प्रत्यक्ष बघणे, वाचणे वा ऐकणे यातील अनुभवात बराच फरक पडू शकतो. चित्रपट आपण एकाचवेळी बघतही असतो आणि ऐकतही असतो म्हणून त्याचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच चित्रपट प्रदर्शीत होण्या आगोदर त्याची गाणी वा संवाद जाहिरातीसाठी वापरले जातात. ते ऐकून आपली उत्सुकता ताणली जाते व आपण चित्रपटगृहाकडे वळतो. १९४२ मधील ‘चले जाव’ चळवळी पासून स्वातंत्र्याचे वारे […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..