नवीन लेखन...
चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने !

नुकताच मी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे “ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या डोक्यात विचारांचे कल्लोळ माजू लागले. दिघे साहेबांचे जे असंख्य चाहते होते त्यात मी सुद्धा होतो. फक्त चाहताच नव्हे तर मी त्यांचा अनेक दशके त्यांचा अनुयायी आणि सहकारी सुद्धा होतो. दिघे साहेब हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भविष्यात या विषयावर कुणीतरी डॉक्टरेट नक्की मिळवेल इतके त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड मोठे आणि गूढ होते या बद्दल माझ्या मनात शंका नाही . […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३

अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला ” […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १

इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना

सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले. […]

मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!

पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल. […]

‘अनसेफ मोड’ मधले आपण

आपण सध्या unsafe mode मध्ये व्यवहार करीत आहोत.तुमचे लोकेशन, डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,online खरेदी ,whats app ,फेसबुक या सर्व नव्या गोष्टींचे अप्रूप असल्याने आपण त्या सर्वांच्या आहारी गेलो आहोत .तुम्ही फेसबुक वरून सुद्धा लॉग इन करून खरेदी करू शकता. तुमचे लोकेशन ,तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर ,सर्व काही सार्वजनिक झाले आहे. […]

राईट टू डिस्कनेक्ट !

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही. […]

माझी मैना गावावर राहिली !

महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही .. […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..