नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।। आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे ।।२।। लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।। विकृत ती मनाची वृत्ती स्वच्छंदीपणात ती असते […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।। […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर […]

पोकळ तत्वज्ञान

कालेजच्या होस्टेल मध्ये रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची …..
[…]

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू, जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा […]

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत नामस्मरण , असू घ्या मुखांत …१ काय सांगावी, नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३ नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय, ईश समर्पण नामानी साधती, प्रभू सर्वजण…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे….१ प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२ तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३ जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व […]

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे । आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।१।। फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते । त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२।। उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी । वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३।। कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती । वाटत होते […]

1 177 178 179 180 181 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..