नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।। नदी कांठच्या वनीं, थुई थुई नाचूनी, पिसारा फुलवुनी, तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।१।। मोरपिसे सुंदर, रंग बहारदार, दिसे चमकदार, बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं, मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।२।। रुप डौलदार, चाल […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी, लाचार ठरतो अखेरी, जाण माणसा मर्यादा तव, आपल्या जीवनी परी ।।१।। क्षणाक्षणाला अवलंबूनी, जीवन असे तुझे सारे, पतंगा परि उडत राहते, जसे सुटत असे वारे ।।२।। निसर्गाच्याच दये वरती, जागत राहतो सदैव, कृतघ्न असूनी मनाचा तूं, विसरून जातो ती ठेव ।।३।। निसर्गाच्या मदती वाचूनी, जगणे शक्य नसे तुजला, जीवन कर्में करीत असतां, […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत, प्रयत्न व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात ।।१।। सावध होऊनी प्रथम पाऊली, टाळावे संकट, मध्यभागी शिरल्यानंतर, दिसत नाही वाट ।।२।। मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली, चुकूनी पडतां पाऊल , खेचला जातो खाली ।।३।। जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटत जातो, मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो ।।४।। वेगवान जीवन […]

त्यागवृत्ती

जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।। हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।। दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।। आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।। ‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं […]

चक्षु पटलावरील ती छबी

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक प्रसंग आठवतो. गुलबर्ग्याला पंडितजी कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंतप्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे. माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते. फक्त निमंत्रीतानाच आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।। बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।। नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।। जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।। प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी, जाणूनी फुकाचे ।।१।। लागत नसते, दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे, अकारणा पोटीं ।।२।। वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।। वेडे आहोत सारे, कसे होई मूल्य वेळ जातां मग, आयुष्य जाईल ।।४।। आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।। डॉ. […]

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।। डॉ. भगवान […]

1 174 175 176 177 178 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..