नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे, खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।। तोच अचानक तेथे, चिमणी एक आली, मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।। जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला, काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।। माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती, बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।। मध्येच उडूनी जाई, […]

दृष्टांताची किमया

दृष्टांताची किमया निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो, करी जगाचा प्रतिपाळ ।।१।। दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप ।।२।। दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे ।।३।। कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया, परि टिपून घेई […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे । सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे । कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला […]

सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत, ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच मिळते ।।१।। प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशीबाचा, जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।२।। फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई, परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।३।। चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले, जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी, वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेऊनी ।।१।। दूर जाऊनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरीता, जग सारे घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता ।।२।। वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला वृक्ष, पिल्लासाठी गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य ।।३।। शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी पडला होता, पिल्लामधली कुजबुज, असह्य […]

एक अफलातून व्यासंग

एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे …..
[…]

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी, विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।। द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे, द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।। वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन, हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे, मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।। धावूनी आला […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।। कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।। कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।। जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार, माझी […]

दुजातील ईश्वर

दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर । ‘अहं ब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।। देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव । त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।। आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा । ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग […]

विसरण्यातील आनंद

विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा, आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा ।।१।। दृष्य वस्तूंचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं, आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी ।।२।। वस्तूंच्या आठवणी, सुख देई आम्हांला, क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला ।।३।। उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी, विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी […]

1 167 168 169 170 171 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..