नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।।   आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।।   शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।४।।   कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर […]

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

खरी स्थिती

मला नाही मान, मला नाही अपमान, हेच तूं जाण, तत्व जीवनाचे ।।१।।   कुणी नाही सबळ, कुणी नसे दुर्बल, हा मनाचा खेळ, तुमच्या असे ।।२।।   कुणी नाही मोठा, कुणी नसे छोटा, प्रभूच्या ह्या वाटा, सारख्याच असती ।।३।।   विविधता दिसे, ती कृत्रिम असे, निसर्गाची नसे, ती वस्तूस्थिती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

मक्षिकेचे आत्मसमर्पण

उडत उडत एक मक्षिका, देवघरांत शिरली, पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।। धुंदीमध्ये बागडत होती, मूर्तीच्या बसे शिरावरी, धूप, गंध आणि सुमनावरूनी, जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।। पंख चिमुकले हलवीत ती, मूर्तीपुढें गांऊ लागली, प्रसाद दिसतां पंचामृताचा, प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।। नैवेद्याच्या क्षीर सागरीं, आत्मसमर्पण तिने केले, प्रभू सेवेत तल्लीन होऊनी, जन्माचे सार्थक केले […]

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे, कष्ट सोसले शरिर मनानें,  चीज त्याचे झाले दिसे ।।१।। बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने, यश ना पडले पदरी.  पाठ फिरविली नशीबाने ।।२।। निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती, शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।। लिहिता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता, छंद […]

निसर्गाचा चमत्कार

सोळा वर्षांचा ज्ञानोबा महाकवी झाला, गीतेंवरी टिपणी लिहून मुकुटमनी ठरला ।।१।।   गजाननाचा आशीर्वाद लाभला त्याला, ज्ञानेश्वरीचा प्रवाह हातून वाहूं लागला ।।२।।   अष्टावक्र दिसे विचित्र परि महागीता रचली, अकरा वर्षाच्या मुलानें मान उंचावली ।।३।।   विटी दांडू खेळत असतां काव्य करुं लागला, शारदा होती जिव्हेवरती ज्ञान सांगू लागला ।।४।।   निसर्गाची रीत न्यारी चमत्कार तो […]

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।। झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला सारे  […]

जीवन प्रभूमय

जीवन काय आहे, मला जे वाटत असे, ते समजून घ्या तुम्हीं, प्रभूमय ते कसे ।।१।। मृत्यूचा तो विचार, कधी न येई मनी, मृत्यू आहे निश्चित, माहित हे असूनी ।।२।। भीती आम्हां देहाची, कारण ते नाशवंत, न वाटे मरूत आम्ही, आत्मा असूनी भगवंत ।।३।। आत्मा आहेची अमर, मरणाची नसे भीती, जी भीती वाटते, ती असते देहाची ।।४।। […]

हर घडी मिळो सहवास

मानव देह देऊनी ईश्वरा, उपकार केले मजवरती, सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती ।।१।। कर्म दिले मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई  त्याचमुळे, उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।। मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई प्रभूसेवेने, परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।। एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देई मजला, […]

देहातील शक्ती

नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा  । थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते  ।।१।। अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून  । भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती  ।।२।। आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते  । भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोमी पुलकित होते  ।।३।। अवयवे सारी स्फूरुनी जाती,  देहामधूनी विज […]

1 155 156 157 158 159 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..