Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम यश येई तुला, तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ, आपल्या शक्तीचे झेपेल कां ते, विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी निराश न होई, त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४. डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे । काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे । आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी । विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।। वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा, सार्थकी लावा आयुष्य, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. […]

मेडीकल एथिक्स !

मेडिकल एयेथिक्स ( Medical Ethics ) अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत.
[…]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१। सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३। रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान, जीवन अग्नी पेटत राही    उर्जा निघे त्याचे ठायीं । उर्जेचे होते रुपांतर      साधत असे कार्य त्यातून, भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार । व्यक्त करण्या भावना      उर्जा लागे त्यांना, एकाग्र करा मना      सोडूनी सारी भावना । एकाग्र चित्त हेच ध्यान    प्रभू मिळण्याचे साधन, सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच ईश्वरार्पण होई […]

1 150 151 152 153 154 180
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..