नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मानव-जग-परमेश्वर

शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर […]

भावनेच्या आहारीं

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास […]

चिमण्यांनो शिकवा.

चिव् चिव् करित बोलतां   तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना     देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून     येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे      असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी    तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता     धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या       शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी      प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली       कौतूक करणारी शब्द […]

अमेरिकेतील एक – – Dating Center

अमेरिकेतील एक – – Dating Center (डेटींग — मनाची उकल संकल्पना ) अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १ चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २ वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३ मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी […]

प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।   शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।   तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।   आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, सेवा शक्ति मला […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।। तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।। ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।। शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। सुख असो वा […]

सुप्त शक्ती

खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  । मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।। अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  । हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।। उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  । सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।। उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती […]

हिशोबातील शिल्लक

हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं  । जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं  ।। घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण  । प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण  ।। कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता  । उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता  ।। कधी काळचा निवांतपणा, घालविला […]

1 145 146 147 148 149 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..