नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

शुर्पणखाची एक सुडकथा

रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट. लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो […]

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।। वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. भगवान […]

कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,  चोहीकडे  ।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,  माना डोलावती  ।। जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना  ।। सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती  […]

ऋणानुबंध

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

चारोळ्या

 काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून,  मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून सारेच चोर  (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते,   पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात,  चोर आहेस म्हणून माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला,  बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते […]

1 136 137 138 139 140 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..