Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे […]

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

कन्येस निराश बघून

कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असताना कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी सांज समयी बंद झापडे,  ठेवीत त्यांना बाह्य एकटे नित्य दिनीच्या प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी चिमण्या बांधीत घरटे पूनरपी,  दिवसभरीचे […]

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम अनंत त्याचे दाम तुलनेसी ब्रम्हांडी  ।। जड तुझीच पारडी पुंडलीक तुझ्यासाठी विसरला जगत् जेठी  ।। कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ शब्दांत नाही सामर्थ्य   ।। बलिदानाची तू मूर्ती ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी किर्ती   ।। कष्ट करुनी वाढविले छोटे विसरती तुला होऊन मोठे  ।। सोडीनी एकटे तुजसी पंख फुटता उडे आकाशी   ।। निरोप देऊन प्रेमाचा कळस […]

२६ जानेवारी २०२०

प्रिय वाचक वर्ग मंडळीना भारतीय प्रजासत्तक दिनानिमीत्य शुभेच्छा.   जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता ।। पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा द्राविड उत्कल बंग  । विंध्य, हिमाचल, यमुना गंगा उच्छल, जलधितरंग  । तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे गाहे तव जयगाथा जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता  ।। जय […]

स्वभाव मालिका

रक्तातुनी गुण-दोष उतरतो,  वंश परंपरेने व्यक्तीतील स्वभाव धर्म,  जाणता येतो रक्ताने…१, मनांतील विचार मालिका,  कृत्य करण्या लाविती सभोवतालच्या परिस्थिती रूपे,  रक्ताला जागविती…२, कर्म फळाच्या लहरींना,   रक्त शोषून घेई, ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी,  बिजे उत्पन्न होई….३, बिजांचे मग रोपण होवूनी,  नव जीवन येते स्वभाव गुणांची मालिका,  अशीच पुढे जाते…४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

पाप वा पूण्य काय ?

काय पूण्य ते काय पाप ते,   मनाचा हा खेळ जाहला ज्यास तुम्ही पापी समजता,   कसा काय तो तरूनी गेला….१,   कित्येक जणाचे बळी घेवूनी,   वाल्या ठरला होता पापी मनास वाटत होते आमच्या,   उद्धरून न जाई कदापी….२,   मूल्यमापन कृतिचे तुमच्या,   जेव्हा दुसरा करित असे, सभोवतालच्या परिस्थितीशी,  तुलना त्याची भासत असे…..३   तेच असते पाप वा पुण्य,  […]

जीवन प्रवासी

तुझ्या घरि आले विसंबूनी,  तव प्रेमाचे पडतां बंधन सात पाऊले टाकीत टाकीत,  सोपविले तव हातीं जीवन सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी ऋणानुबंधाच्या ह्या गांठी,  बांधल्या गेल्या पडतां भेटी जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक […]

श्रीकृष्णाचे जीवन : बनली एक गाथा

श्रीकृष्णाचे जीवन   बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन   चिंतन त्याचे करिता    ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा    शिकवी तुम्हा मुरलीधर    ||२|| बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी    ||३|| मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी    ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

1 2 3 165