नवीन लेखन...
Avatar
About अपूर्वा जोशी
मी अपूर्वा जोशी. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

गॊष्ट एका राणीची.. (निवड)

अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा. […]

गॊष्ट एका राणीची (निकाल)

इयत्ता नववी मध्ये ८६% मिळवून सईने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.राणीला एवढ वाईट वाटलं नव्हत तसं, कारण नववीच्या वर्षाचा शेवटचा गणिताचा पेपर तिला खूप कठीण गेला होता तेपण फक्त एका गणितामुळे. […]

आयुष्यावर बोलू काही……

सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का?? […]

तुम्ही जे आहात, ते तुम्ही नाही आहात….

जर तुम्हाला एकाएकी खुप पैसे मिळाले तर तुम्ही तुमचे आयुष्य कसे बदलाल??  या प्रश्नाच उत्तर देताना जर तुमचा पहिला निर्णय नोकरी सोडून देईन असा असेल तर ही धोक्याची सूचना आहे हे लक्षात घ्या. अनेक यशस्वी लोकांची जेव्हा तुम्ही आत्मचरित्र वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांनी कामाची एवढी गोडी लावून घेतली होती की ते काम करताना त्यांना खूप मज्जा येत होती किंवा त्यांनी असे क्षेत्र निवडले ज्याची त्यांना आवड होती त्यामुळे ती काम त्यांनी मनापासून केली आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते. […]

आता कशाला उद्याची बात?

सतत भविष्याच्या काळजीमुळे आपण आपल्या आसपासच्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत,आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वेळ कमी देत आहोत,जीवनाचे अमुल्य क्षण वाया घालवत आहोत आणि या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या गोष्टी हातामधून गेल्यावर होते,हे आपले दुर्भाग्यच.उद्याचा अति विचार करून आपण आपल्या आजच्या सुखांवर विरजण तर नाही टाकत आहोत ना…..?? […]

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..