नवीन लेखन...

आम्ही सारे कायस्थ

परवा मी गांवदेवी मार्केटमधे भाजी घेण्यात व्यस्त होते. तोच कानावर शब्द पडले….. अग मोहिनी उद्या सोमवार! पण  बिरड्याचे वाल टाकायचे राहिले नं काल, ते सोललेले वाल घ्यायला मला नाय बाई आवडत. आता करीन झालं ‘वडीचं सांबार’.…. ते टिपीकल “कायस्थी” शब्द ऐकून मी बाजूला आदराने बघितलं. मग ओळख निघाली … मग कुठूनतरी नातं देखील निघालं…हे अस्सं असतं आम्हां कायस्थांचं. […]

तिच्यासारखी तिच

काय म्हणावे स्त्रिला, जादूगार कि किमयागार? कि आयुष्याच्या रंगभूमिची, चतुरस्त्र कलाकार? दुर्गा-काली, लक्ष्मी-सरस्वती, रुपे तिची चार अष्टावधानी चित्ताची ती एक चतूर नार | ध्यास घेऊनी धैर्यानी ती, लढा देते सार्थ, तिच्या अंगी करारीपण अन, निर्णयाचे सामर्थ्य | “झांशिची राणी”, “जिजाऊ” ह्या तर, मूर्तिमंत आदर्श सावित्रीबाई – रमाबाईचे स्तिमित करते कार्य | जीवन देऊनी जगणे तुमचे, नारी […]

महिला दिन (दीन?)

अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज | मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा | मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत | घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला […]

एकापेक्षा एक

‘झी’ ने एक अनाऊन्समेंट केली, ऐकून मनाची चलबिचल झाली, भाग घ्यायची मी तयारीच केली, कारण स्पर्धा होती …. एकापेक्षा एक “आजी” आली | हे आणि मुल म्हणे, अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ, ‘महागुरुंच्या’ डोळ्यात मावेल कां हा ‘ढग’ ? पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट, म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप | काय नशिब पहा, चक्क […]

चारोळी – लग्न

लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार, लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार, मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार, पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार | — सौ. अलका वढावकर

कामवाली

नाही कशी म्हणू, पगार जास्त देते थांब, परी माझे काम सोडून जाऊ नको लांब.. ! नाही कशी म्हणू तुला, तुझा काढते वीमा, फंड पण विरोधात नको माझ्या पुकारुस बंड.. ! नाही कशी म्हणू तुला, T.V. पहा दूपारी, परी आधी माझे काम आणि, मग जा शेजारी.. ! नाही कशी म्हणू तुला, वर्षाकाठी साडी, परी सोसायटीमधल्या मला, सांग […]

सखा

माझ्या मनाच्या कोपर्‍यांत, तू घर करुन असतोस जरी मला वर्षातून एकदाच भेटतोस लहरी तर इतका की, लहानासारखा रुसतोस अन् ठरलेल्या वेळी यायचच टाळतोस, पण आलास की, हळवा होऊन मला बिलगतोस, म्हणून तर मला तू खूप आवडतोस येताना ओंजळभर सुगंध आणतोस, अधिर मनाला क्षणांत खुलवतोस. कधी कधी भारीच हं, धसमुसळा वागतोस अन् निलाजरेपणाने अंगचटीलाही येतोस, पण आलास […]

संसाराची सप्तपदी

अरे संसार संसार, मालिकांच्या काट्यावर आधी नारी सोफ्यावर, ब्रेकमधे मग कुकर अरे संसार संसार, गोजीरवाण्या ह्या घरांत एकापेक्षा एक इथे, अग्रिहोत्री जे वाडयात अरे संसार संसार, चार दिवस सासूचा, आहे मग कुलवधूच्या, भाग्यलक्ष्मीच्या कुंकवाचा अरे संसार संसार, ह्याला जीवन ऐसे नाव, पिंजरा त्याले म्हणू नये, तिथे वारसाचा ठाव अरे संसार संसार, लज्जतदारशा मेजवानीचा चारचौघी सुगरणींचा आणि […]

अतिरेकी सरकार

जखमा उरांत माझ्या, आहेत अजूनी ताज्या, शासनकर्त्या नाकर्त्या तू हो आता तरी जागा गेंडयाच्या तव कातडीची तू, कुठवर राखशी नीगा? त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू काढ शोधूनी धागा स्फोट मालिका सदाच घडती, मुंबापुरीच्या कुशीत, निद्रीस्त सुरक्षा तुझी, घुसती अतिरेकी वेशीत पूरे जाहले नाटक तुमचे, समिती-चौकशी–खटल्याचे, वरातीमागून धावत येते, घोडे तुमचे नित्याचे जनतेच्या मग पैशावरती, दान वाटिता लाखाचे […]

एक हळव प्रेम

आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ नाना-नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ अहो दात नाहीत तरी घेतले चणे-दाणे चघळायला […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..