नवीन लेखन...

उत्सव प्रकाशाचा; फटाक्यांचा नव्हे

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु, फटाक्यांमुळेमोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्यांमधील विषारी रसायनांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. मानवाप्रमाणेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो. ही सर्व हानी रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वापरावर काही मर्यादा आणल्या पाहिजेत. […]

पारंपरिक सृजनोत्सव

अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.
[…]

अव्यवहार्य योजनेचा अट्टाहास

राष्ट्रीय सुरक्षा समितीने केंद्र सरकारला नुकतेच अन्न सुरक्षा विधेयक सादर केले. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रयरेषेखाली तसेच सामान्य आणि सधन जीवन जगणार्‍या लोकांना दरमहा 35 किलो धान्य माफक दरात दिले जाणार आहे. अशा प्रकारची योजना लागू करण्याचा सोनिया गांधींचा अट्टाहास आहे. पण, त्यापायी या योजनेतील त्रुटींकडे दुलर्क्ष करण्यात आले आहे. […]

गॉडफादरच्या शोधात…

सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
[…]

राजकारणाचे मोदीकरण !

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
[…]

न्यायालयाची प्रत्ययकारी तळमळ

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीवर ताशेरे ओढून सामान्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे आणि महसूल या महत्त्वाच्या खात्यांमध्ये आढळणार्‍या भ्रष्टाचारामागचे मूळ कारण म्हणजे किचकट कायदे. सरकारी कामांमध्ये होणार्‍या दिरंगाईबाबत ठोस कायदे तयार झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. त्या दृष्टीने पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही.
[…]

पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता वाढला

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे. […]

खरेच संपतोय नक्षलवाद

नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्‍यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल.
[…]

निर्णयात भक्ती-भावनेचा विचार

बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
[…]

लढा दारिद्र्य हटवण्यासाठी

जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..