नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

मिशन राणी गंज

काल युट्युब वर मिशन राणी गंज हा सुंदर सिनेमा पाहिला. मी शक्यतो सिनेमा माझी मुलगी प्राजक्तासोबतच बघत असते, म्हणजे मग छान शेअरिंग, गप्पा होतात. पण आता ती इथे नसल्यामुळे एवढ्यात एकटी एकटी मूवी बघते. […]

गेट-टुगेदरचा गाळीव अनुभव

या फेसबुक आणि व्हाट्सअपमध्ये पब्लिक फारच गुंतलेय असं तुम्हाला वाटतं ना? मलाही तसंच वाटतं.’ नुसतं वाटून काय उपयोग काहीतरी करायला पाहिजे!’ असं भाषणात म्हणतात ना ते खरच आहे. मग ठरवलं या सगळ्या दोस्ताना फेसबुक व्हाट्सअप वरून उठवायचं आणि चांगले गेट-टुगेदर करायचं. दोस्तांचा ग्रुप परत जमवायचा. लागलो कामाला. पक्या, दिल्या, उम्या, सूर्या टाकले मेसेज व्हाट्सअप वर एकेकाला. […]

करून गेला गाव नाही नाही जळगाव

चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो….दिवस उजाडला… संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली….दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर…. गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला…भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले…तुम्ही या फिरीसन…झाले एक तास काय करू सगळे… यू […]

अगतिक (भयकथा)

यंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता. […]

हॉटेलातल्या सूक्ष्म कथा

एक प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे. आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते. दोन हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार […]

कटींग चाय

काल असाच कामानिमित्त घराबाहेर पडलो.कामासाठी वेळ लागणार होता. बराच वेळ घालवूनही वेळ होताच. तेव्हाच रस्त्याच्या बाजूला एक टपरी दिसली.मस्त पातेल्याबाहेर चहाच्या वाफा येताना दिसल्या.चला म्हटलं एक चहा घेऊ या. एकटाच होतो आणि केवळ वेळ घालवायचा होता तशी चहाची वेळ झाली होती. […]

बहुरूपी

“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली […]

अपेक्षांचे जीवनातील महत्व आणि स्थान ?

सर्वसाधारणपणे अपेक्षांच्या भोवतीच जीवन फिरत असते. बहुतेंक अपयश वा समस्या या अपेक्षांचा ताळमेळ नीट न जुळल्यामुळे निर्माण होतात. बऱ्याच अपेक्षा या स्वयंपुर्ण राहिल्यास आटोक्यात राखता येतात. दुसऱ्या संबंधीत असलेल्या अपेक्षांची टक्केवारी तर अगदी नगण्य आहें. यात आई, वडील, नवरा, बायको, मुलेे, इतर नातेवाईक, मित्र, सामाजिक इत्यादींशी संबंध येतो. […]

माझी माय मराठी

लिहितो मराठी बोलतो मराठी शिकतो मराठी शिकवते मराठी संस्कार मराठी संस्कृती मराठी शब्द मराठी शब्दात मराठी म्हणून भाषा मराठी सण मराठी वार मराठी उत्सव मराठी उत्सवात मराठी पाडवा मराठी गोडवा मराठी वारी मराठी वारकरी मराठी म्हणून टाळ चिपळीचा नाद मराठी विर मराठी शुर मराठी तिर मराठी नुर मराठी सैनिक मराठी सैन्यात मराठी क्रांतीवीर मराठी स्वातंत्र्यवीर मराठी […]

अहंकार

अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा. […]

1 2 3 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..