नवीन लेखन...

अनुराधा नक्षत्र

सत्तावीस नक्षत्रांपैकी 17 व्या क्रमांकाचे हे नक्षत्र. अनुराधा हे नावच स्त्रीलिंगी आहे. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही मातृत्व जागरूक आणि जागृत असलेली असते. मृदू स्वभावाच्या या नक्षत्रावरील जन्मलेल्या व्यक्ती या पृथ्वीतत्त्वाचा असल्यामुळे यांनी शीतरंग हे वस्त्र प्रावरणाच्या रंग निवडीत अधिक प्रमाणात उपयोगात आणावेत. निळा मोरपंखी हिरवा हॅलो आकाशी लीफ ग्रीन आणि कधीतरी सप्ताहातून एखादे वेळेस लालसर नारिंगी रंगांचे कपडे उदाहरणार्थ पंजाबी, टॉप, साडी, नाईटी, गाऊन इत्यादी हे महिलांसाठी तर पुरुषांनी टी-शर्ट, शर्ट, जब्बा, नेहरू शर्ट, इत्यादी वापरात आणावे. ब्राउन किंवा तपकिरी हा रंग ही यांच्यासाठी लॉटरी सारखे फळे देणारा ठरतो.

भाताच्या ढिगाप्रमाणे या नक्षत्राचा अवकाशात दिसणारा आकार आहे. चार तारे या नक्षत्रात दिसतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा नक्षत्र अनुराधा असते. अशा व्यक्तींनी डाळिंब हे फळ खाण्यामध्ये नियमित ठेवावे. म्हणजे वृश्चिकेचा एक गुण जो इतरांना न परवडण्यासारखा असतो तो जरा कमी कमी होईल. या व्यक्ती शक्यतोवर कठीण शब्द बोलताना वापरत नाहीत. मात्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतील कुठल्याही कारणासाठीची सहनशक्ती संपुष्टात आल्यावर या व्यक्ती एखादे वाक्य अगदी शब्द देखील,वृश्चिकेच्या डंख मारण्याप्रमाणे वापरतील की, समोरची व्यक्ती बेजार वा घायाळ होऊन जाते. या नक्षत्रासाठी अग्नेय दिशा भारत चांगली. ज्या वास्तूत या व्यक्ती वास करतात, त्या वास्तू बरोबर या व्यक्तींची घट्ट मैत्री जमते. कारण वास्तुपुरुष देखील अग्नेय दिशेला असतो.

या नक्षत्राची देवता मित्र असून नागकेशर हा आराध्यवृक्ष आहे. ओम मित्राय नमः हा जप कुलस्वामी कुलस्वामिनी जपानंतर १०८ वेळा म्हणाल्यास अशा व्यक्तींना परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग (सोल्युशन/सोलूशन)आपोआप मिळते.  नागचाफा या आराध्यवृक्षाशिवाय बकुळ/केवडा हेही आराध्याचे उपवृक्ष म्हणून योजलेले आहेत.

आपण आपल्या देवतांचे वा प्रियजनांची छायाचित्रे वा फोटो जवळ ठेवतो त्याप्रमाणे आपल्या आराध्य वृक्षाचा फोटो देखील या व्यक्तीने जवळ ठेवल्यास यांना आणखी जादुई परिणामांचा अनुभूती येतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा इंग्रजी महिन्यांचा काळ या नक्षत्र धारकांसाठी सुगीचा काळ असतो. म्हणजे बारा महिन्यांपैकी या महिन्यांच्या काळात या व्यक्तींनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे फळ हे मिळतेच. नागकेशराला  वर्षातून जशी दोन वेळा फुले येतात त्याच प्रमाणे या व्यक्तीही वर्षातून किमान दोन वेळा आनंदी जीवनाचा अनुभव घेतात.

मित्र पद्मासनारुढं अनुराधेश्र्वरं भजे ।
शूलां कुशल  सद्षांहूं युग्यंशोणित वर्णकम् । हा मंत्र जप या व्यक्तींनी म्हटल्यास अधिक उत्तम. शिवाय

अनुराधाधियोमित्रः आयुष्योवर्धकस्तथा ।
सर्वारिष्ट विनाशाय मित्रायच नमो नमः ।। हा जप देखील या व्यक्तींनी केला तर पीडा हरण होतील म्हणजे नष्ट होतील. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती दयाशील, बुद्धिवान, प्रवासी, अल्प पुत्रवान, शांत आणि स्त्रियांसाठीहे नक्षत्र अधिक चांगले गुण देते जसे उत्तम मैत्री, मैत्रिणी देते, अभिमान नसणारी प्रसन्नता देऊनसर्वांना मान्य असणारे व्यक्तिमत्त्व देते. गुरुभक्ती सह या नक्षत्रावरील स्त्रिया या अखंड सौभाग्य प्राप्त करणाऱ्या असतात.

सर्वांची काळजी घेणाऱ्या या नक्षत्रावरील स्त्रियांची काळजी मात्र स्वतःलाच घ्यावी लागते. वरील रंगांबरोबरच यांनी सोनेरी आणि पांढरा तसेच चंदेरी रंग ही उपयोगात आणण्यास हरकत नाही.

शुभम भवतु

– गजानन सिताराम शेपाळ.

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 22 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

2 Comments on अनुराधा नक्षत्र

  1. नमस्कार
    गजानन शेपाळ यांचा संपर्क क्रमांक किंवा ई-मेल द्यावा ही विनंती
    शेखर जोशी
    9821267244

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..