नवीन लेखन...

अधिकारी असावा तर असा!

अधिकारी असावा तर असा! ‘या’ जिल्ह्यात ना ऑक्सिजन ,ना बेड चा तुटवडा,
हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं.
ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं
नंदूरबारः संपूर्ण देशाला सध्या करोना संसर्गानं ग्रासलं आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्यातून होत आहेत. मात्र, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा, बेडची कमतरता या समस्यांनाही आरोग्य प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील नंदूरबार या जिल्ह्यात मात्र पूर्णपणे वेगळी परिस्थीती आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळं जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आहे.
आदिवासी बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी अपुऱ्या यंत्रणेसह करोनाचा लढा दिला. मागील वर्षी फक्त २० बेड असलेल्या नंदूरबारमध्ये आता रुग्णालयात १ हजार २८९ बेड, कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ११७ बेड आणि ग्रामीण रुग्णालयात ५ हजार ६२० बेड उपलब्ध आहेत. करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा उभी केली आहे. इतकंच नव्हे तर, महाविद्यालये, हॉटेल, सोसायटी आणि मंदिरांमध्येही बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, ७ हजारांहून अधिक आयसोलेशन बेड आणि १,३०० आयसीयू बेड्स उभे केले आहेत.
ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं. राज्यभरात नंदूरबार मॉडेल राबवण्याची गरज आहे.
२०१३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी मिळवणारे डॉ. भारुड यांनी करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेत डिसेंबरपासून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये मागील वर्षी सरासरी १५- २० आरटीपीसीआर टेस्टची क्षमता होती. आता जवळपास करोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीने वाढून १५०० पर्यंत गेली आहे. हे सगळं डॉ. भारुड यांच्या प्रयत्नानं शक्य झालं आहे.
डॉ. भारुड यांनी जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून ३ ऑक्सिजन प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३ हजार प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार होते. ऑक्सिजन बनवण्यासाठी लिक्विड टँक बसवण्याचेही काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच, कोविड रुग्णांसाठी मागील ३ महिन्यात २७
रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत.
डॉ. राजेंद्र भारुड यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला आहे. त्याच्या जन्माच्याआधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालं आहे. त्यांच्या आईनंच त्यांचं पालनपोषण केलं आहे. डॉ. राजेंद्र हे मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर जीएस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्ष असतानाच त्यांनी यूपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले.
डॉ. भारुड साहेबांचा आदर्श लाचखाऊ शासकीय अधिकार्यांनी घ्यावा.गरीब जनतेला लुबाडन्यातच धन्यता मानणार्या कलीयुगाच्या प्रतिनिधीनो जागे व्हा.
संतोष द पाटील

Avatar
About संतोष द पाटील 22 Articles
FREELANCE WRITER IN MARATHI,ENGLISH ,POET,SOCIAL ACTIVIST, SOCIAL WORKER.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..