नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग एकोणीस

१९ दोन नंबरला कुठे जावे ?
पूर्वी घरात जेवण करावे आणि मलविसर्जनाला घराबाहेर जावे अशी पद्धत होती. आता काळ बदलला. आता घराबाहेर खायचे आणि घरात येऊन मलविसर्जन करायचे ???

करणार तरी काय म्हणा शहरीकरण ही गरज झाल्याने त्याला आता पर्यायच नाही. असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे झाले.

पण जंतुसंसर्गाचा मोठा सोर्स आपण घरातच आणून ठेवल्यावर काय करणार ?
नशीब अजून घरात “त्यासाठी” पाणी वापरले जाते आहे.

आणि
२०. अजून कोणी पाणी वाचवा मोहिमे अंतर्गत कागदच वापरा योजना सुरू करा योजनेची घोषणा केलेली नाही. पण पाश्चात्य देशात मात्र या कागद वाचवा योजनाच चालतात. तिथे जेवल्यानंतर सुद्धा वाटीभर पाण्यात हात बुचकळून कागदाला बोटं पुसायची पद्धत. मग नंतरच काय विचारता ?
बाय द वे कागद वापरण्यापेक्षा पाणी वापरणेच आरोग्याला हितकर आहे. आणि आर्थिकदृष्टया देखील कागद परवडत नसावा. मग अट्टाहास का तेच कळत नाही.

२१. मलविसर्जन करायला जाण्यापूर्वी नंतर हात पाय धुवायला लागणारे पाणी आधीच काढून ठेवायची आपली पद्धत होती. रिकामा तांब्या सुद्धा बालदीत बुडवायचा नाही. तो आधीच भरून ठेवायचा. अगदी आजच्या पुणेरी पाट्याच्या भाषेत सार्वजनिक स्वच्छतागृहात वाक्य लिहायचे झाले तर “आधी आणि नंतर पुरेसे पाणी वापरा आणि हो, जाताना डाव्या हाताने दरवाजा उघडू नका” अशा पाट्या खरंच लिहाव्या लागतील.
आधी पाणी भरून ठेवले नाही आणि नंतर हंड्यात तांब्या बुचकळून काढला, म्हणून अख्खा हंडा ओतून टाकून वर डाव्या हातावर आजोबांनी मारलेली छडी लक्षात राहिली असती तर उजवा हात डावा हात पक्का लक्षात राहिला असता.
असो.
असो म्हटलं की. सगळं क्षम्य असतं ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..