निर्वाणषटक (आत्मषटक) मराठी अर्थासह
श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. […]