नवीन लेखन...

संकासुर.. प्रवास एका असुराचा… देवत्वाकडे

एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. […]

गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले. […]

राधे, केवढा केशसंभार

राधे, केवढा केशसंभार,जीव गुंतला त्यात फार, का असे ते मोकळे सोडशी, केसांची जादू मिरवशी, –!!! रक्षक की मी या विश्वाचा, दुसरा तिसरा नच” कोणता, असे असूनही बघ किती,— केशकलापां पडलो फशीं,–!!! केस तुझे मानेवरून रुळती, बटां -बटां वाऱ्यावर खेळती, बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, ‌ अडके त्यात जीव, हीच भीती–!!! सुंदर काळेभोर कुंतल, खूप त्यात खोल गुंतती, […]

त्या रात्री !

वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे.  मुलगी, स्वाती (जर्मनीत),  मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक ‘आदर्श जेष्ठ नागरिक ‘ होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.  […]

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग ३

गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल  योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा. […]

आज मन आनंदले

आज मन आनंदले, सुखाच्याही पार गेले, भंवसागरी तरणे खासे, आता सोपे वाटले,–!!! दुनियादारी निभावणे, असते किती कठीण, तरीही तावून-सुलाखणे, सहजी कसे जमले,–!!! मनमोर थुई थुई नाचे, पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,–! खंबीर,धीरगंभीर राहणे, तटस्थभूमिका निभावावी, येऊ देत वारे–वादळे, मात्र एक झुंज द्यावी,–! तुझ्यापेक्षा मी सरस, म्हणत त्यांन भिडावे, संकटांचे सतत घोर, […]

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग २

कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे  चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. […]

थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का?

जर का आपण थोडेसे जरी कष्टाचे काम केले तर दम लागतो का? आपल्याला नेहमीच पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो का? एखादे साधारणसे वजनदार सामान उचलण्यास आपण घाबरता का? याचा अर्थ तुम्ही बहुतेक लवकर थकत असाल. […]

रुद्रा – कादंबरी – भाग १८

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! […]

1 8 9 10 11 12 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..