नवीन लेखन...

फोर्टमध्ये फिरताना – भाग ३

टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्‍या आहेत. […]

व्यर्थ झगडे

सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात   ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण   ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला   ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून   ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण   ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।। डॉ. भगवान […]

लोपलेले श्रेष्ठत्व

डोळे उघडून बघा तुम्हीं    आपल्या देशाला  । महानतेची परंपरा    दिसेल तुम्हाला  ।।१।। जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी    नाव होते त्याचे  । आज विसरलो महत्त्व सारे    आपल्या पूर्वजांचे  ।।२।। दोष असेल त्यांचा कांहीं    सोडून  द्यावा  । परि अभिमान हा परंपरेचा   मनात ठेवावा  ।।३।। डोळ्यांनी जे बघतो सारे    सत्य  समजता  । कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे    चूक  ठरविता  ।।४।। कित्येक गोष्टीची उकलन होती   वेदामध्ये आपल्या  । परि पुराणातील वांगी समजूनी    फेकून त्या दिल्या  ।।५।। आमचे जवळील ज्ञान गंगाजळ    आम्ही  विसरतो  । परकियांची कास धरूनी    वाट  भटकतो  ।।६।। ते तर आहे महाठगते     वेद नेई चोरूनी  । पिऊनी आमचीच ज्ञान गंगा    चाले मान उंचावूनी  ।।७।। विचार करावा थोडा याचा    शांत चित्ताने  । […]

छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ

छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला. मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रकारिता सुरू केली. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी […]

दयेची कसोटी

करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं करितो […]

ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस

ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. ‘घरोघरी हीच बोंब’, ‘कार्टी श्रीदेवी’, या नाटकांबरोबरच, ‘विच्छा माझी पुरी करा’ […]

गायीचे प्रेम

रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची   हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला  हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल  काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीस  कोटी देवांचे  दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते. तेहतीस कोटी […]

महान ग्रंथकार

  दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले,   ह्या जगावरती रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती…..१, धन्य जहाले वाल्मिकी व्यास,  ज्यांनी ग्रंथ लिहीले मानवातील विविधतेचे,  दर्शन ते घडविले….२, विश्वामधला प्रत्येक विषय,  हाताळला दोघांनी शोधून काढण्या काही,  निराळे समर्थ नाही कुणी….३, आद्य कवी वा लेखक म्हणूनी,  मान तयांना आहे अनुकरण ते त्यांचे करिता,  पुष्प तयांना वाहे….४   डॉ. भगवान […]

सृजनरंग

रंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती. […]

1 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..