नवीन लेखन...

त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा

राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान […]

२ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम […]

प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ

‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले गायक म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित […]

आकाशवाणी पुणे केंद्र

२ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे… !!! सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली. आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती […]

गदीमा उर्फ ग.दि.माडगूळकर

गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या […]

मजरुह सुलतानपुरी

भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला. आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी […]

एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन

“महान” या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी.बर्मन सर्वार्थाने दादाच होते. त्यांचा जन्म १ आक्टोबर १९०६ रोजी झाला. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ओर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणाऱ्या इतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि […]

1 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..