नवीन लेखन...

संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे […]

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब […]

प्रख्यात शास्त्रीय गायिका व पंडित कुमार गंधर्व यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून वसुंधरा कोमकली यांची ओळख होती. वसुंधरा कोमकली यांचा जन्म २३ मे १९३१ रोजी जमशेदपूर येथे झाला. १९४२ मध्ये त्यांनी आधी कलकत्ता आणि तिथून कुमार गंधर्व आणि प्रोफेसर बी. आर. देवधर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवण्यासाठी मुंबई गाठली. त्यानंतर कुमार गंधर्व यांच्याशीच विवाह करून त्या देवास येथे स्थायिक झाल्या. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग २

आपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे. […]

कारगिल युद्ध – १९९९

२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. […]

पावने-रावळे

आपल्याकडे अतिथीला देव माणून पुजण्याची पद्धत होतीच, ग्रामिण भागात अजुनही शिल्लक असेल. पावने म्हणजे रावळे, हेच ‘अतिथि देवो भव’ […]

कौल आणि इस्लाम

श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल…! […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो ! […]

राऊळ – एक आडनांव

आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीतलं एक आडनांव. कुडाळ नजिकच्या पिंगुळीच्या ‘राऊळ महाराजां’मुळे सर्वदूर परिचित आडनांव. गुजरातेत आढणारं ‘रावळ’ किॅवा ‘रावल’ आडनांव म्हणजे राऊळचंच गुजराती व्हर्जन.. […]

1 2 3 4 5 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..