नवीन लेखन...

कशाला हवयं विदर्भ राज्य ?

महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात […]

मी येतोय… ५ सप्टेंबरला !!

विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना. च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात […]

आरती प्राणप्रियेची

(माझी प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिचा हा ७१ वा जन्मदिन. तिच्या निधनानंतरच्या या प्रथम जन्मदिनीं, तिच्या स्मृतीला मी या अर्चनेनें अभिवादन करतो आहे.) आरती  प्राणप्रियेची तिनें उधळली माझ्यासाठी अंजलि आयुष्याची  ।।   अर्धांगी-मम, सुहास्यवदना खुलवियलें नित अमुच्या सदना तिच्यामुळे चिरहर्ष मिळे, ती साम्राज्ञी हृदयाची  ।।   संगम बुद्धी आणि कलेचा ठामपणा अन् चातुर्याचा, स्मित-शिडकावा, मर्मिक-वच  जिंकती मनें सर्वांची  […]

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो. […]

आहाररहस्य १२

आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले. म्हणजे, मी जे तेल लहानपणापासून खात आलोय ते मला कसे पचवायचे, ते माझ्या शरीराला माहीत असते. त्यासाठी विशिष्ट कष्ट घेण्याची शरीराला गरज […]

पिताम / दादड येणे

अंगावर गांधी (दादड) उठून, अत्यंत त्रास देणाऱ्या अश्या “पिताम” बद्दल आज पाहुया. ह्या पिताम/दादड सोबत खाज येत असेल तर त्याला उदर्द, कोठ असे म्हणतात तर वेदना जास्त असल्यास आयुर्वेदात शीतपित्त असे नाव आहे. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Urticaria म्हणतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वास हा रोग जडू शकतो, ह्या रोगात अंगावर अचानक गांधी (दादड) उठतात व अंगास खाज सुटते. […]

आहाररहस्य ११

आहाराचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्दात वर्णन केला आहे. दीपो भक्षयन्ते ध्वान्तं कज्जलंच प्रसूयते । यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायेते तादृशी प्रजा ।। ज्या प्रमाणे दिवा जळतो आणि काजळी तयार होते, तसा जसा आहार तशी परिणति होते. जसा दिवा तशी काजळी. म्हणजे जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. जर दिवा […]

सत्य जीवन

हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा, दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।   अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे, खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।   नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा, मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।   बाह्यांगाचे कर्म […]

1 20 21 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..